पाकिस्तानात भीषण अपघात...दोन मुलांसह,६जणांचा मृत्यू

18 Mar 2024 16:32:53
इस्लामाबाद, 
pakistan accident पाकिस्तानमध्ये एक वेदनादायक दुर्घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात घराचे छत कोसळल्याने दोन मुलांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये एका घराचे छत कोसळल्याने एका घरात राहणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दक्षिण वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्यातील रघझाई भागात सोमवारी ही घटना घडली.
 

rtrt 
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला
pakistan accident छत कोसळण्याच्या या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातावर प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. यासोबतच पीडितांच्या कुटुंबीयांना मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामध्ये सातत्याने दहशतवादी कारवाया होत आहेत. आता या अशांत परिसरात एक भीषण अपघात झाला. दरम्यान, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भागात सर्जिकल स्ट्राईक केल्याची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यात 7 तालिबान ठार झाले आहेत. अफगाणिस्तानात घुसल्यानंतर पाकिस्तानने दोन दहशतवादी तळांवर हा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. यासाठी दोन प्रांतांना लक्ष्य करण्यात आले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसून तेहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खोस्त आणि पाकिता प्रांतात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा हवाई हल्ला करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0