नवभारत साक्षरता अभियानांतर्गत वृद्ध शेतमजूर निरक्षर दाम्पत्यांनी दिली परीक्षा

19 Mar 2024 16:13:20
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Navbharat Literacy Mission केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत 15 वर्षावरील जिल्ह्यातील 15 हजार 571 निरक्षर परीक्षेस पात्र होते. त्यांची रविवार, 17 मार्च रोजी जिल्ह्यातील 16 ही तालुक्यात घेण्यात आली. यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत कार्ली येथील केंद्रावर गावातील पंच्याहत्तरी पार केलेल्या मनीराम रामपुरे व सखुबाई रामपुरे या शेतमजूर निरक्षर जोडप्याने पायाभूत व सं‘याज्ञानावर आधारित तीन तासांची परीक्षा देत आनंद व्यक्त केला.
 

Navbharat Literacy Mission
 
यापुर्वी कधीही शाळेत न जाणार्‍या या वृद्ध दाम्पत्यांची शिक्षणाची आवड लक्षात घेता. कार्ली येथील केंद्रसंचालकासह पर्यवेक्षकांनी त्यांची परीक्षा घेवून उत्स्फुर्तपणे त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी शिक्षणाबद्दलची आवड बोलुन दाखविली. 70 वर्षापूर्वी शिकण्याची इच्छा असताना ती पूर्ण होवू शकली नाही. Navbharat Literacy Mission आता ती पूर्ण झाली व आम्ही दररोज या वर्गात येवून शिक्षण घेणार अशी प्रतिकि‘या त्यांनी बोलुन दाखविली. या वृद्ध दाम्पत्यांनी सर्वसामान्य नागरिकांना शिकण्याची प्रेरणा दिली. याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी मिश्रा, शिक्षणाधिकारी (योजना) किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी, उपशिक्षणाधिकारी डॉ. नीता गावंडे, गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे, विस्तार अधिकारी विद्या वैद्य, विस्तार अधिकारी नलिनी वंजारी, दीपिका गुल्हाने, केंद्रप्रमुख स्वप्नील फुलमाळी, प्रसिद्धीप्रमुख राजहंस मेंढे व सर्व केंद्रप्रमुखांनी मनीराम व सखू रामपुरे दाम्पत्याचे कौतुक केले आहे.
Powered By Sangraha 9.0