अंशुल वावरे
नागपूर,
Unmarried Pregnancy : मेडिकल नागपूरच्या स्त्रीरोग-प्रसूतीशास्त्र विभागाच्या अहवालावरून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. २०२१ ते २०२३ या कालावधीत मेडिकलच्या स्त्रीरोग-प्रसूतीशास्त्र विभागात १०५ अविवाहित गर्भवती उपचारासाठी आल्या. यातील ८८.७ टक्के तरुणींना ओळखीच्या किंवा जवळच्याचं नातेवाईकांकडून गर्भधारणा झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील ५५.२ टक्के प्रकरणांमध्ये ओळखीचे किंवा शेजारी राहणारे, तर ३०.५ टक्के प्रकरणांमध्ये जवळचे नातेवाईक असल्याचे समोर आले. यावरून किशोरवयीन मुला-मुलींमध्ये लैंगिक शिक्षणाची गरज असल्याचे पुढे आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनात स्त्रीरोग-प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंजुश्री वाईकर, युनिट हेड डॉ. अनिल हुमणे यांच्या सहकार्याने डॉ. रेणुका देशमुख यांनी यावर अभ्यास केला. यात विभागातील समाजसेवा अधीक्षक सुरेखा तातेवर यांचीही मदत मिळाली.
वडिलांच्या जागेवर निवडणूक लढवणार चिराग
४२ टक्के अविवाहित गर्भवतींचे वय १८ ते २२ दरम्यान
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा धक्का
लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि आर्थिक परिस्थिती कठीण असलेल्या * तरुणीच्या लैंगिक समस्येकडे या अभ्यासाने लक्ष वेधले. १०५ अविवाहित गर्भवतींमध्ये ४२.९ टक्के तरुणींचे वय १८ ते २२ दरम्यान होते.
Unmarried Pregnancy अर्ध्याहून अधिक म्हणजे ५३.३ टक्के तरुणी ग्रामीण भागात राहत असून, जवळपास निम्म्या म्हणजे ४९.५ टक्के महिलांचे शिक्षण हे हायस्कूलपर्यंतच झाले होते. आर्थिक स्थितीचा विचार करताना ४१ प्रकरणांमध्ये तरुणींचे कुटुंब हे मध्यमवर्गीय होते.
५४ टक्के अविवाहितांनी केला गर्भपात
५४.३ टक्के अविवाहितांनी गर्भपात करवून घेतले. ज्या अविवाहितांनी बाळांना जन्म दिला त्यापैकी १२.५ टक्के बाळांचा जन्मानंतर काही दिवसांतच मृत्यू झाला. तसेच ३७.५ टक्के अविवाहितांनी आपल्या बाळांना अनाथालयाकडे सुपूर्द केले. Unmarried Pregnancy उर्वरित ५० टक्के बाळांची जबाबदारी मातेने आणि त्यांच्या वडिलांनी मिळून घेतली.
४४.८ टक्के मुली चांगल्या कुटुंबातील होत्या.
या अभ्यासात असेही दिसून आले आहे की, ४४.८ टक्के अविवाहित गर्भवती या चांगल्या कुटुंबातील होत्या. चिंताजनक बाब म्हणजे, ४० टक्के अविवाहितांच्या कुटुंबात मद्यपान सुद्धा केले जात होते. Unmarried Pregnancy तर २९.९ टक्के अविवाहितांवर घरगुती हिंसा सुद्धा व्हायची.
१८.१ टक्के अविवाहितांनी आत्महत्येचाही प्रा प्रयत्न केला होता.
९ टक्के प्रकरणांमध्ये पालकांचे मुलांवर नियंत्रण कमी असल्याचे दिसून येत होते. तर ५ टक्के प्रकरणांमध्ये पालक वेगळे राहत असल्याचे सुद्धा समोर आले. Unmarried Pregnancy विशेष बाब म्हणजे, ६.७ टक्के प्रकरणांमध्ये कोणत्याही सामाजिक समस्यांचा उल्लेख केला गेलेला नाही.
यावरून किशोरवयीन मुला-मुलींना लैंगिक शिक्षणाची गरज किती महत्वाची आहे हे दिसून येतील. हा आकडा फक्त नागपूरच्या मेडिकल मधला आहे. तर विचार करण्यासारखी बाब आहे. अशे कितीतरी मुलींचे गर्भपात केले गेले असेल. ते सुद्धा कुणाचे दवाखान्यात तर, कुणाचे विविध प्रकारच्या ज्या शरीराला घातक अश्या असणाऱ्या गोळ्या किंवा इंजेक्शनद्वारे. Unmarried Pregnancy मुला- मुलींना कुठल्या वयात लैंगिक शिक्षणाची गरज भासते हे पालकांना कळायला हवं आणि ते त्यांच्या मुलांना असे काही घडू नये यासाठी त्यांना लैंगिक शिक्षणाचा धडा शिकवायला हवा, जेणेकरून असले प्रकार थांबतील. लैंगिक शिक्षण हे फक्त पालकांकडूनच मिळावं असे नव्हे तर ते शाळा आणि कॉलेजेसच्या माध्यमातून सुद्धा त्यांना अतिशय महत्वाचे आहे. आणि जागरूकता निर्माण करायला हवी. जेणेकरून असे धक्कादायक बाब पुढे आढळून येणार नाही. मुलांनी लैंगिक संबंधात कुठला प्रश्न जर केला तर त्यांना टाळण्याऐवजी त्यांना त्यातला वाईट आणि चांगला गुण समजून सांगणं अतिशय महत्वाचे ठरणार.