दुचाकींच्या अपघातात दोघांचा मृत्यू

02 Mar 2024 20:39:06
तभा वृत्तसेवा
वरूड, 
bike accident : वरूडवरून मुलताईकडे जाणार्‍या रस्त्यावरील वरूड नजीक असणार्‍या रडके पेट्रोल पंपाजवळ शनिवार 2 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास दोन दुचाकी समोरासमोर भिडल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकी चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे तर एक चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.
 
 
bike accident
 
अतुल पंजाबराव गोहत्रे (42 वर्ष, रा. सातनुर), मोरेश्वर इवनाते (24 वर्ष, रा. राझाडी पिपला जि. पांढुर्णा) अशी अपघातातल्या मृतकांची नावे आहे. दृष्टी अतुल गोहत्रे (10 वर्ष) ही गंभीर जखमी आहे. अतुल एमएच 27 डिडी 5812 क्रमांकाच्या दुचाकीने मुलगी द़ृष्टी हीला घेऊन वरूड वरून शे.घाट मार्गे सातनुरला जात होता. तिवसाघाट रोडवरील अनिल प्लास्ट या कॅरेट कॅक्टरीत काम करणारा मोरेश्वर एमएच 27 सीटी 1550 क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. रडके यांच्या पेट्रोल पंपाजवळ दोन्ही दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाल्याने हा अपघात झाला. अपघात होताच नागरीकांनी गर्दी करत पोलिसांना माहिती दिली. तिघांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी उपरोक्त दोन्ही इसमांना मृत घोषित केले. चिमुकलीला पुढील उपचारासाठी नागपुर येथे हलविण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0