ईडीसमोर हजर राहण्यास अडचण नाही, अटकेपासून संरक्षण द्या

20 Mar 2024 21:43:14
- अरविंद केजरीवाल यांची उच्च न्यायालयात भूमिका
 
नवी दिल्ली, 
अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने बजावलेल्या समन्सच्या विरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक Arvind Kejriwal अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तुम्ही चौकशीसाठी ईडीसमोर हजर का होत नाहीत, असा प्रश्न न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत केजरीवालांना विचारला. ईडीसमोर हजर राहण्यास अडचण नाही, पण संरक्षण द्या, असे त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात सांगितले.
 
 
Arvind Kejriwal
 
न्यायालयाकडे संरक्षणाची मागणी केली होती. पण, ते देण्यास नकार दिला, अशी माहिती वकिलाने उच्च न्यायालयात दिली. केजरीवाल तपास यंत्रणेसमोर हजर होत नाहीत. त्यांना हजर होण्यात कोणती अडचण नाही. पण, त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. Arvind Kejriwal केजरीवाल यांना आतापर्यंत 10 समन्स बजावण्यात आले आहेत, असे सिंघवी यांनी न्यायालयात सांगितले. चौकशीसाठी केजरीवाल आभासी पद्धतीने हजर होण्यास तपार आहेत. हजर होण्यात कोणतीही अडचण नाही. फक्त अटकेपासून केजरीवालांना संरक्षण हवे आहे. ईडीने कायदेशीर प्रकि‘या आणि तरतुदींनुसार समन्स बजावलेले नाही, असा दावा सिंघवी यांनी केला.
Powered By Sangraha 9.0