लिटील वूड्स विद्यालयात ‘साज’ संगीतसंध्या थाटात

    दिनांक :20-Mar-2024
Total Views |
गोंदिया, 
Little Woods School : येथील लिटील वुड्स इंटरनॅशनल शाळेत संगीतसंध्या ‘साज़’ कार्यक्रमाचे आयोजन 16 मार्च रोजी थाटात करण्यात आले.
 
 
sjdfklj
 
 
कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक पारधी यांनी केले. दीपप्रज्वलन शाळा संचालक आशिष अग्रवाल, मुख्याध्यापिका रुपाली मेहता यांनी केले. प्रारंभी माता शारदेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून माता सरस्वतीचे यथासांग पुजन, वंदन झाले. दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध गीत गायन करुन शास्त्रीय नृत्य सादर केले. त्यांना संगीत शिक्षक नारायण पिठोळे, नृत्य शिक्षिका स्वाती पिंपळापुरे, मिताली कुट्टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन शिक्षिका आभा गर्ग आणि शिक्षिका समिक्षा बोरकर यांनी केले.