नीट परीक्षेवर बंदी, पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा देणार

    दिनांक :20-Mar-2024
Total Views |
- द्रमुकचे जाहीरनाम्यातून आश्वासन
- उमेदवारांची यादी जाहीर
 
चेन्नई, 
NEET exam : लोकसभा निवडणुकीसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बुधवारी त्यांच्या द्रमुक पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. याशिवाय लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादीही त्यांनी जाहीर केली. पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा आणि नीट परीक्षेवर बंदी, अशी आश्वासने द्रमुकने जाहीरनाम्यातून दिली आहेत. चेन्नईत झालेल्या या कार्यक‘माला खासदार आणि स्टॅलिन यांची बहीण कनिमोझी आणि पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते.
 
 
NEET exam
 
NEET exam पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करताना मु‘यमंत्री स्टॅलिन म्हणाले, द्रमुक निवडणुकीपूर्वी जाहीरनामा तयार करतो. आम्ही जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो. आमच्या नेत्यांनी आम्हाला हेच शिकवले आहे. द्रविडीयन मॉडेल अंतर्गत ज्या योजना राबविण्यात आल्या, त्या तामिळनाडूच्या हितासाठी आहेत. या योजना भारतभर नेल्या जातील. स्टॅलिन यांनी यावेळी त्यांची बहीण कनिमोझी यांचे कौतुक केले. ते म्हणाले, कनिमोझींनी प्रत्येक जिल्ह्यासाठीच्या योजनांवर लक्ष केंद्रित करणारा एक अद्भूत जाहीरनामा तयार केला आहे. त्यांनी प्रमुख गोष्टींवरही त्यात प्रकाश टाकला आहे. हा केवळ द्रमुकचा नाही, तर जनतेचा जाहीरनामा आहे, असेही स्टॅलिन यांनी नमूद केले.
 
 
NEET exam : राज्यांना संघराज्य अधिकार देण्यासाठी भारतीय संविधानात बदल करणे, चेन्नई येथे सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ, पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मागे घेण्यात येईल. महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्यात येईल. सरकारी शाळांमध्ये सकाळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येईल. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हटवण्याचे आश्वासनही द्रमुकने दिले आहे.