घरच्या झाडांना पाणी कोण घालणार? करा या सोपी ट्रिक,झाड राहतील फ्रेश

    दिनांक :20-Mar-2024
Total Views |
house plants आपण आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा गॅलेरीत मोठ्या हौसेने झाड लावतो.जर आपण  काही दिवसांसाठी सुट्टीवर गेलो,आणी  झाडांना पाणी घातले नाही तर ही झाड कोमेजून जातात.या झाडांची मुलांप्रमाणेच काळजी घ्यावी लागते. झाडांना दररोज पाणी घालावे लागते.झाडांना दररोज पाणी घातल्याने झाड ताजीतवानी, फ्रेश दिसतात. या झाडांना वेळच्यावेळी योग्य प्रमाणांत खत, पाणी, सूर्यप्रकाश मिळाला तर ही झाड बहरुन येतात.
 
 
tree
 
सूर्यप्रकाश व पाणी या दोन झाडांच्या वाढीसाठी असणाऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. सध्या सणावाराचे दिवस सुरू आहेत, यानिमित्ताने आपण काहीवेळा सुट्टी घेऊन बाहेर फिरायला निघतो. अशावेळी आपल्याला चिंता लागून राहते ती झाडांना पाणी कोण घालणार ? या झाडांकडे कोणी लक्ष देणार ,कुटुंबातील सर्वजण एकत्र बाहेर पडले तर अशावेळी फिरायला बाहेर पडताना आपला अर्धा जीव त्या झाडांच्या काळजीने बेजार होतो. तसेच काहीवेळा आपण परत येईपर्यंत या झाडांना पाणी न मिळाल्याने काहीवेळा ती कोमेजून जातात. अशावेळी नेमके काय करावे हे सुचत नाही.house plants घरी असलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी काही सोप्प्या गोष्टी लक्षात घेऊयात. जेणेकरुन, आपण परत येईपर्यंत झाडांना व्यवस्थित पाणी मिळून ती आहेत तशीच फ्रेश राहतील 
 
झाडांना पाणी घालण्याच्या सोपे उपाय 
झाडांना बरेच दिवस पाणी नाही मिळाले तर झाड कोमेजून जातात. यावर एक सोपा उपाय म्हणून आपण एक साधी आणि सोपे  उपाय  वापरु शकतो.
 
१. एक मोठी प्लॅस्टिकची रिकामी बॉटल घ्यावी. शक्यतो बॉटल थोडी मोठी घ्यावी जेणेकरुन त्यात जास्तीत जास्त पाणी राहू शकेल.
२. आता या बॉटलच बूच गच्च लावून बंद करून घ्यावे. या बाटलीच्या बुचाला बरोबर मधोमध एक लहान छिद्र पाडून घ्यावे.
३. या बुचाला पाडलेल्या लहान छिद्रांत एक एअर बड्स घालून घ्यावा.
४. आता ही बॉटल कुंडीतल्या मातीत उलटी उभी करून ठेवता येण्यासाठी म्हणून त्या बॉटलला दोन्ही बाजुंनी दोन लाकडी काट्या चिकटपट्टीच्या साहाय्याने चिटकवून घ्याव्यात.
५. त्यानंतर ही बाटली पाण्याने पूर्ण भरून घ्यावी. आता बाटलीचे बूच गच्च लावून घ्यावे.
६. पाण्याने बाटली भरुन घेतल्यानंतर ही बाटली कुंडीतल्या मातीत, बाटलीला लावलेल्या काटीच्या मदतीने उलटी करुन ठेवावी. असे केल्याने बाटलीच्या बुचाला पाडलेल्या लहान छिद्रांतून थेंब थेंब पाणी पडत राहते. हे पाणी कुंडीतल्या मातीत मुरुन झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचते.
या एका झटपट होणाऱ्या सोप्या ट्रिकचा वापर करून आपण झाडांना किमान पुढेचे ४ ते ५ दिवस नक्कीच पाणी देऊ शकतो. अशा प्रकारे सुट्टीत झाडांना पाणी घालायच्या काळजीने सुटका मिळेल.