काँग्रेसने जिंकलेल्या महाराष्ट्रातील एकमेव जागेची अशीही वाताहत !

Congress-Chandrapur-Warora काँग्रेसी नेत्यांच्या तोंडाला फेस

    दिनांक :21-Mar-2024
Total Views |
वेध 
- संजय रामगिरवार
 
Congress-Chandrapur-Warora २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अवघ्या महाराष्ट्रातून लोकसभेची केवळ एकच जागा जिंकता आली होती आणि ती चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघाची होती. Congress-Chandrapur-Warora वरोडा विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी सेनेला रामराम करीत काँगे्रसची उमेदवारी सादर केली आणि या मतदार संघातून विजय मिळविला होता. Congress-Chandrapur-Warora एका अर्थाने, ही एकमेव जागा काँग्रेसला जिंकून देऊन त्यांनी या पक्षाची लाजच राखली होती. पण आज त्याच मतदार संघाची काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अक्षरशः वाताहत होत आहे. Congress-Chandrapur-Warora खासदार असतानाच ३० मे २०२३ रोजी बाळू धानोरकर यांचे निधन झाले. आज त्यांची पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचीच या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी फरफट होत आहे. Congress-Chandrapur-Warora बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक होईल, असे सर्वांना वाटले होते. पण वर्षभरातच सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने तेव्हा पोटनिवडणूक होऊ शकली नाही.
 
 

Congress-Chandrapur-Warora 
 (संग्रहित छायाचित्र)
 
आता जेव्हा २०२४ च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. तेव्हा या मतदार संघातून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, या आशेत प्रतिभा धानोरकर यांना स्वपक्षीयांशी भांडावे लागत आहे. Congress-Chandrapur-Warora आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी या उमेदवारीवर दावेदारी रेटली आहे तर भाजपाने आघाडी घेत या जागेसाठी सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या अत्यंत दमदार नेत्याची उमेदवारी जाहीरही केली आहे. काँग्रेसच्या उमेदवारीचे भिजत घोंगडे मात्र अद्याप कायम आहे. आता तर स्वतः विजय वडेट्टीवार यांनीच या जागेसाठी उभे राहावे, असे पक्षाकडून सांगितले जात असल्याची चर्चा आहे. Congress-Chandrapur-Warora ही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची खेळी असू शकते. कारण या नेतेद्वयांमधून विस्तवही जात नाही, असे बोलले जाते. काहीही असो, पण एकेकाळी काँग्रेस पक्षाला या राज्यात भोपळा मिळविण्यापासून वाचवणाऱ्या या मतदार संघात कुणाला उमेदवारी द्यावी, हा बिकट प्रश्न काँग्रेस पक्षापुढे उभा ठाकला आहे.
 
 
काय केल्याने ही जागा आपल्याला राखता येईल, या चिंतेत काँग्रेसी नेत्यांच्या तोंडाला फेस येत आहे. Congress-Chandrapur-Warora कारण, भाजपाकडे मुनगंटीवार यांचा झंझावात आहे. शिवाय ते जाती-पातीच्या राजकारणापलीकडचे एक विकासधार्जिणे नेते आहेत. त्यांच्यापुढे अशा स्थितीत काँग्रेस एकसंधपणे सामोरे जाऊ शकेल का, अशी शंका या साऱ्या  घडामोडींमुळे काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांपुढे उभी ठाकली आहे. जवळपास अशीच स्थिती २०१९ च्याही निवडणुकीत होती. सुरुवातीला नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या मुलाचे नाव काँग्रेसने या मतदार संघाच्या उमेदवारीसाठी पुढे केले होते. Congress-Chandrapur-Warora पण भाजपाचे हंसराज अहिर यांच्यापुढे त्यांचा टिकाव लागणार नाही म्हणून काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी ‘भाऊ, हे विशाल मुत्तेमवार कोण रे', ‘आम्हाला असे पार्सल नको' असे बोलायला सुरुवात केली होती. त्यानंतर हे नाव मागे पडले आणि अशोक चव्हाण-मुकुल वासनिक यांच्यातील वादाच्या पर्यावसनाने विनायक बांगडे यांचे नाव पुढे आले.
 
 
Congress-Chandrapur-Warora तेही आर्थिकदृष्ट्या टिकणार नाही, अशी ओरड स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आणि कंटाळून बांगडे यांनी आपली उमेदवारी सोडली. शेवटी बाळू धानोरकर यांनी काँग्रेसचे मैदान सांभाळले. कारण, त्यांनी तेवढ्यासाठीच तत्कालीन शिवसेना सोडली होती. आज प्रतिभा धानोरकर यांना विरोध करणारे विजय वडेट्टीवार यांनीच २०१९ च्या निवडणुकीत बाळू धानोरकर यांना पुढे आणले होते. त्यांच्या उमेदवारीसाठी वरिष्ठांशी भांडले होते. Congress-Chandrapur-Warora पुढे त्यांच्यात वितुष्ट आले. आता हेच दोन घराणे एकमेकांपुढे उभे ठाकले आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाची काँग्रेसच्या लेखी होत असलेली अशी वाताहत आता चर्चेचा विषय असून याही निवडणुकीत हा लोकसभा मतदार संघ काँग्रेसच्या उमेदवारीसाठी गाजतो आहे. वरिष्ठ काँग्रेसी नेत्यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. Congress-Chandrapur-Warora पण तिढा काही सुटण्याचे नाव घेत नाही. येत्या काळात ही उमेदवारी कोणते वळण घेईल, हेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
९८८१७१७८३२