अंशुल वावरे,
छिंदवाडा,
Sahaja Yoga-Nirmala Devi : श्री माताजी निर्मला देवी यांचा जन्म 21 मार्च 1923 रोजी छिंदवाडा येथे झाला. आज त्यांचा १०१ वा जन्मदिवस त्यांचे भक्तगण सहजयोग या भाषेत त्यांना सहजयोगी असे म्हणतात ते जिथे-जिथे त्यांचे सेंटर/आश्रम आहेत तिथे- तिथे आज भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येत आहे. त्यांचे वडील, एक वकील होते त्यांनी 14 भाषांमध्ये अस्खलित लेखन केले. त्यांनी कुराणचे हिंदीत भाषांतर केले होते. त्यांच्या आई भारतातील पहिली महिला होत्या ज्यांनी गणितात ऑनर्स पदवी मिळवली होती.

त्यांचे आई-वडील भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सक्रियपणे सहभागी झाले होते. लहानपणी त्या महात्मा गांधींसोबत त्यांच्या आश्रमात राहायच्या. त्यांनी 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला. त्यांनी लुधियाना येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि लाहोरमधील बालक्रम मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतले.1947 ते 1970 या काळात त्यांनी गरजूंना संरक्षण दिले. 5 मे, 1970 रोजी त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक जीवन कार्याला सुरुवात केली. वयाच्या ४७ व्या वर्षी, त्यांनी एक मार्ग शोधला आणि सामूहिक आत्म-साक्षात्कार देण्याची पद्धत विकसित केली. अध्यात्मिक ज्ञान शोधणाऱ्यांचा फायदा घेणार्या अनेक तथाकथित गुरूंच्या विपरीत, लोक स्वत:ला बदलण्यासाठी वापरतील असा खरा अनुभव देण्याची त्यांची इच्छा होती.
सुप्त आध्यात्मिक उर्जा जागृत करणे हाच उद्देश
निर्मला यांनी आपल्या आध्यात्मिक कार्याची सुरुवात लोकांच्या एका लहान गटासह केली, युनायटेड किंगडममध्ये व्याख्याने देऊन तसेच आत्म-साक्षात्काराचा अनुभव दिला. त्यांनी या कार्यक्रमांसाठी कधीही पैसे आकारले नाहीत, सर्व मानवांमध्ये सुप्त आध्यात्मिक उर्जा जागृत करणे त्यांना योगा शिकवणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे अशी त्यांची आस्था होती. श्री माताजींनी 1980 च्या दशकात संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिकेला विनामूल्य पद्धतीने व्यख्याने दिली. क्लेस नोबेल यांनी लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये 1997 मध्ये त्यांना नोबेल पुरस्काराने नामांकन करण्यात आले होते.
माताजींनी निराधार महिला आणि मुलांसाठी घर, अनेक आंतरराष्ट्रीय शाळा, आरोग्य आणि संशोधन केंद्र आणि शास्त्रीय संगीत आणि ललित कला यांना प्रोत्साहन देणारी आंतरराष्ट्रीय अकादमी यासह अशासकीय संस्था स्थापन केल्या. त्यांचा वारसा या संस्थांद्वारे तसेच सहज योग अभ्यासक आणि 95 हून अधिक देशांमध्ये स्थापन केलेल्या ध्यान केंद्रांद्वारे चालू आहे जिथे नेहमीप्रमाणे सहज योग शिकवला जातो.