वर्धेत फायनल अमर काळे तुतारी घेणार हाती!

22 Mar 2024 19:50:02
वर्धा,
Amar Kale : महाविकारी आघाडीतील मुख्य पक्ष असलेल्या काँग्रेसकडे वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार नसल्याने उमेदवार शोधू मोहीम सुरू होती. दरम्यान पवारांनी वर्धा लोकसभा मतदारसंघावर जाळे फेकले. पवार गटांनी आग्रहाने स्वतःकडे ठेवल्यानंतर आर्वी येथील काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे शरद चंद्र पवार या पक्षाचे वर्धा लोकसभेचे उमेदवार होणार आहेत. माजी आमदार अमर काळे यांनी आपण इंडिया आघाडीचा उमेदवार होणार असल्याचे तरुण भारत सोबत बोलताना स्पष्ट केले.
 
 
Amar Kale
 
 
परंपरागत काँग्रेसकडे त्याला वर्धा लोकसभा मतदारसंघ आपल्याच ताब्यात राहील असा भ्रम स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांना होता मात्र शरद पवारांनी विदर्भातील एक मतदार संघ आपलाच ताब्यात राहावा यासाठी काँग्रेसकडे आग्रह धरला. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडे उमेदवारच नव्हता त्यामुळे हर्षवर्धन देशमुखसह अनेक नाव शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून चर्चेला गेली. काँग्रेसकडून आर्वी चे माजी आमदार अमर काळे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती.
 
दरम्यान शरद पवारांनी आमच्या चिन्हावर लढण्यासाठी काळे यांना साकडे घातले. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अमर काळे आता महा विकास आघाडीत शरद पवार गटातील तुतारी या चिन्हावर लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या संदर्भात त्यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांनी पण महाविकास आघाडी कडून लढणार असल्याचे जवळपास 95 टक्के निश्चित झाले असल्याचे तरुण भारत सोबत बोलताना सांगितले.
Powered By Sangraha 9.0