प्रदेश काँग्रेसचे सचिव नितीन कोडवते, चंदा कोडवते भाजपात

    दिनांक :22-Mar-2024
Total Views |
मुंबई, 
गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेते, प्रदेश काँग्रेसचे सचिव Dr. Kodavate couple डॉ. नितीन कोडवते व त्यांच्या पत्नी डॉ. चंदा कोडवते या दाम्पत्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शुक‘वारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक‘माला खा. अशोक नेते, आ. बंटी भांगडिया, बाबुराव घोडे, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे आदी उपस्थित होते. कोडवते पती-पत्नीच्या भाजपा प्रवेशामुळे पक्षसंघटना वाढीसाठी मदत होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
 
 
Kodavate couple
 
याप्रसंगी बावनकुळे म्हणाले की, डॉ. कोडवते यांनी कोरोना काळात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजाची निरपेक्षपणे सेवा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत घडविण्याच्या संकल्पाला साथ देण्यासाठी Dr. Kodavate couple डॉ. कोडवते दाम्पत्याने भाजपात प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांच्या पाठीशी एक कुटुंब या नात्याने पक्ष संघटना खंबीरपणे उभी राहील. डॉ. कोडवते दाम्पत्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपात प्रवेश केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या होत असलेल्या विकासाने प्रेरित होऊन भाजपात आलेल्या कोडवते दाम्पत्याच्या नेतृत्वाला योग्य संधी, सन्मान दिला जाईल.
 
 
मोदी सरकारच्या विकास कार्याने प्रभावित होऊन आम्ही भाजपात प्रवेश केला. पंतप्रधान मोदी यांच्या विकासाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. यापुढे भाजपासाठी निरपेक्ष भावनेने काम करू, असे Dr. Kodavate couple डॉ. नितीन व डॉ. चंदा यांनी सांगितले. डॉ. चंदा यांनी 2019 मध्ये गडचिरोली विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवत 70 हजार मते मिळवली होती.