मद्य घोटाळ्याचे मातोश्री कनेक्शन आहे का?

    दिनांक :22-Mar-2024
Total Views |
- भाजपा आमदार नितेश राणेंचा सवाल

मुंबई, 
मद्य घोटाळ्यातील आरोपी अरविंद केजरीवाल नुकतेच उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला भेटून गेले. ही भेट कशासाठी होती, राजकीय होती की सदिच्छा भेट, की त्यामागे मद्य घोटाळ्याचे मातोश्री कनेक्शन आहे? असे सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केले आहेत. दिल्लीत 6 टक्यावरून 12 टक्के कमिशन करणारे केजरीवाल मद्य धोरण घोटाळ्यात अटकेत आहेत. याचा संदर्भ देतर Nitesh Rane' नितेश राणे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीबद्दल प्रश्न उपस्थित केला.
 
 
Nitesh Rane'
 
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या कारवाईवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा कोणालाही अटक करू शकते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ज्यांच्यापासून हरण्याची भीती वाटते, त्या सर्वांना हे अटक करू शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, लाल-बाल-पाल, वीर सावरकर या सर्वांची भीती वाटत होती. त्यामुळे बि‘टिशांनी त्यांना तुरुंगात टाकले किंवा फासावर लटकवले. मोदींचे सरकार त्याच पद्धतीने काम करीत आहे, असा आरोप राऊतांनी केला.
 
 
संजय राऊत यांच्या आरोपावर नितेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्विट करून पलटवार केला. यात ते म्हणत आहेत, काही महिन्यांपूर्वी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मुंबईत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, Nitesh Rane' नितेश राणे यांनी दिल्लीत मद्य धोरणावर शिक्कामोर्तब होत असताना महाराष्ट्रातील तत्कालीन महाविकास आघाडीने 50 टक्के करसवलत दिली होती. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, असा सवाल उपस्थित केला.