भोजशाळा संकुलाचे सलग दुसर्‍या दिवशीही सर्वेक्षण

    दिनांक :23-Mar-2024
Total Views |
धार, 
मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात असलेल्या Bhojshala Sankul भोजशाळा संकुलाचे सलग दुसर्‍या दिवशी भारतीय पुरातत्त्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. शनिवारी सकाळी आठ वाजता या परिसरात पुरातत्त्व विभागाच्या पथकासह पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 
 
Bhojshala complex
 
Bhojshala Sankul : मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शुक्रवारपासून भोजशाळा संकुलाचे सर्वेक्षण सुरू आहे. या परिसरात देवी सरस्वतीच्या मंदिरासह कमाल मौला मशीद आहे. मंदिराच्या ठिकाणी मशीद बांधण्यात आल्याचा दावा करीत हिंदू संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशावरून पुरातत्त्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. शनिवारी सर्वेक्षण सुरू असताना हिंदू पक्षाचे याचिकाकर्ते आशिष गोयल व गोपाल शर्मा उपस्थित होते. मुस्लिम पक्षकार अब्दुल समद प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही सर्वेक्षण प्रकि‘येत सहभाग घेतला नाही. आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो. सर्वेक्षणाला आमचा विरोध नाही. 2004 च्या न्यायालयाच्या निर्णयानुसार संकुलातील खांब हटविण्यात येऊ नये, अशी आमची मागणी आहे. भोजशाळा संकुलात मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर एप्रिल महिन्यात सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल भसहा आठवड्यात न्यायालयात सादर करायचा आहे.