हिंगोली लोकसभेची जागा भाजपाच्या वाट्याला घ्या

    दिनांक :23-Mar-2024
Total Views |
- भाजपा पदाधिकार्‍यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

महागाव, 
Hingoli Lok Sabha Constituency : हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाट्याला द्यावी, यासाठी भाजपा पदाधिकार्‍यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली आहे. हिंगोली लोकसभा क्षेत्रात भाजपा संघटनेचे जाळे घट्ट विणल्या गेले आहे. तसेच प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या कार्यक्षेत्रात जनसेवेसाठी केलेली विकास कामे, केंद्रशासन, राज्य शासनाने राबविलेल्या लोक कल्याणकारी योजना व पक्षाची असलेली सक्षमता याच्या जोरावर याठिकाणी भाजपाने उमेदवार दिल्यास याचा नक्कीच फायदा होवुन ही जागा भाजपा जिंकु शकते असे भाजपा पदाधिकार्‍यांनी सांगितले.
 
 
y23March-Hingoli
 
Hingoli Lok Sabha Constituency : त्यात हिंगोलीच्या जागेचा तिढा अद्याप सुटला नसल्यामुळे ही जागा भाजपच्याच वाट्याला मागुन घ्यावी यासाठी हिंगोली लोकसभा क्षेत्रातील भाजप जिल्हाध्यक्ष फुलाजी मामा शिंदे, तानाजी मुटकुळे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा गजानन घुगे, शिवाजी माने, रामराव वडकुते, हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास सुमठाणकर, डॉ. श्रीकांत पाटील, प्रदेश सचिव उद्योग आघाडी मिलिंद एम्बल, भाजपा सरचिटणीस उमेश नागरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष संतोष टेकाळे, शहराध्यक्ष कैलास काबरा, लोकसभा अल्पसंख्यांक संयोजक हमीद प्यारेवाले, नवनाथ कानबळे यांच्या शिष्ठ मंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेवुन हिंगोलीची जागा भाजपासाठी कशी फायद्याची असेल याचे विश्लेषण करून ही जागा भाजपच्या वाट्याला मागुन घ्यावी अशी मागणी केली.