तिरोडा,
Kshatriya Powar Samaj Yuva : पोवार समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करुन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे तालुक्यातील चिरेखणी येथील युवा नेतृत्व ओम कटरे यांची पोवार समाजाच्या युवा प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ओम कटरे यांचे समाजासाठी केलेल्या कामाची तसेच समाजाच्या युवकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेली लोकप्रियतेची दखल घेत समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विशाल बिसेन यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. तिरोडा येथे आयोजित सभेत राष्ट्रीय महासचिव प्राचार्य खुशाल कटरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रसंगी ओम कटरे यांनी समाजाच्या हिताकरिता पूर्ण निष्ठांनी काम करत राहण्याची हमी दिली. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय पोवार समाजाच्या जेष्ठ नेतृत्वाला दिले आहे. त्यांचे बाबा भैरम, वाय. टी कटरे, श्रीचंद पटले, किशोर पटले, तारेंद्र रहांगडाले, हंसराज रहांगडाले, ओंकार पारधी, महेंद्र ठाकूर, घनश्याम पटले, मेघा बिसेन, आशा कटरे, मनीषा रहांगडाले आदी समाज बांधवांनी अभिनंदन केले.