सुरुवातीपासूनच चीनचे दावे हास्यास्पद

    दिनांक :23-Mar-2024
Total Views |
- जयशंकर यांनी ड्रॅगनला फटकारले
 
सिंगापूर, 
परराष्ट्र व्यवहारमंत्री S. Jaishankar एस. जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला सिंगापूरमध्ये चोख प्रत्युत्तर दिले. अरुणाचलवर दावा करणार्‍या चीनला फटकारताना, सुरुवातीपासूनच चीन हास्यास्पद दावे करीत असल्याची टीका केली. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यात दहशतवाद हा एक मोठा अडथळा असून, त्याकडे कधीही दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. येथे युद्धस्मारकावर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या जवानांना त्यांनी आदरांजली अर्पण केली.
 
 
jaysankar

 
अरुणाचल प्रदेशातील चीनचे दावे सुरुवातीलाही हास्यास्पद होते आणि आजही आहेत. कारण, तो भारताचा नैसर्गिक भूभाग आहे, असे म्हणत जयशंकर यांनी चीनला सडेतोड उत्तर दिले. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशियन स्टडीज येथे ‘व्हाय इंडिया मॅटर्स’ या पुस्तकावरील व्या‘यानानंतर आयोजित प्रश्नोत्तराच्या सत्रात जयशंकर बोलत होते. चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जयशंकर यांची ही टिप्पणी आली आहे. अलिकडेच चिनी लष्कराने अरुणाचल प्रदेश हा चीनचा नैसर्गिक भाग असल्याचे म्हटले होते. नंतर एका निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे दावे खोडून काढत अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे.
 
 
यावेळी पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्याच्या मुद्यावरही जयशंकर यांनी भाष्य केले. पाकिस्तान आता औद्योगिक स्तरावर दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. अशातच दहशतवादाकडे दुर्लक्ष करण्याच्या स्थितीत भारत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादावर बोलताना, त्यांनी ही क्षणार्धातच होणारी घटना नाही. ही निरंतर चालत राहते. त्यामुळे धोक्याचा सामना करण्यासाठी एक पद्धत शोधावी लागणार असल्याच्या निष्कर्षावर आम्ही पोहोचलो आहोत, असेही S. Jaishankar जयशंकर यांनी नमूद केले.