दिल्लीतील बैठकीत महायुतीचे जागावाटप ठरले

    दिनांक :25-Mar-2024
Total Views |
- लवकरच होणार घोषणा

नवी दिल्ली, 
महाराष्ट्रातील Mahayuti Baithak महायुतीच्या जागावाटपाबाबत शनिवारी रात्री उशीरा दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाला अंतिम रूप देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक लांबल्यामुळे ही बैठक रात्री 1 वाजता सुरू झाली आणि 3 वाजता संपली. जागावाटपाबाबत 80 टक्के काम झाले असून, उर्वरित 20 टक्के काम झाल्यानंतर जागावाटपाची घोषणा करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
 
Mahayuti
 
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजपाचे महासचिव विनोद तावडे आणि नंतर गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. मनसे महायुतीत येणार हे स्पष्ट झाले असून, लोकसभेच्या जागावाटपात त्यालाही सामावून घ्यावे लागणार आहे. याआधी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाबाबत अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी राज्यातील बहुतांश जागांवर सहमती झाली असून, काही जागांवर सहमती होऊ शकली नव्हती. त्यामुळे जागावाटपाला अंतिम रूप देण्यासाठी शनिवारी रात्री पुन्हाMahayuti Baithak  महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत झाली.
 
 
Mahayuti Baithak  : महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिलला मतदान होत आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात मतदान असलेल्या गडचिरोली तसेच भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा भाजपाला करता आली नाही. या दोन्ही मतदारसंघावर राष्ट्रवादी काँगेसने दावा केला आहे. महाराष्ट्रातील आणखी काही लोकसभा मतदारसंघाबाबतही महायुतीत एकमत होऊ शकले नाही. भाजपाने 20 उमेदवारांच्या नावांची घोषणा आतापर्यंत केली आहे.