खोटे बोलणे थांबवा, स्वतःचा 15 जागांचा वाद सोडवा

    दिनांक :25-Mar-2024
Total Views |
- प्रकाश आंबेडकरांचा मविआ नेत्यांना इशारा

मुंबई, 
काँग्रेस, उबाठामधील 15 जागांबाबतचा वाद आधी सोडवा, असा खोचक टोला लगावत, वंचितला चार जागा दिल्या, यासारखे खोटे बोलणे थांबवा, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मविआ नेत्यांना दिला. Prakash Ambedkar प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत असलेली युती संपुष्टात आल्याची घोषणा केली. मात्र, त्यांनी काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे सांगितले. ज्या जागांवर आमच्या मतदारांमुळे काँग्रेसला फायदा होईल, अशा मतदारसंघांची यादी त्यांनी आम्हाला द्यावी, असे आंबेडकर म्हणाले.
 
 
Prakash Ambedkar
 
आमच्या प्रतिनिधींसोबत प्रत्यक्ष चर्चा झाली, तेव्हा एक अकोला मतदारसंघ वगळता अन्य कुठलाही मतदारसंघ देण्याबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे संजय राऊत आणि मविआ नेत्यांनी खोटे बोलणे आधी बंद करावे, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी मविआबाबत त्यांची नाराजीही उघडपणे बोलावून दाखवली. आमच्या मागणीला फार प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला कुठेतरी सामावून घ्यायचे म्हणून त्यांचा प्रयत्न चालू आहे. मविआमध्येच काही मतदार संघांबाबत मतभेद आहेत. काँग्रेसने उमेदवार यादी जाहीर केली. मतभेद असलेल्या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले नाहीत. काही मतदारसंघ उबाठा गटाने तर, काहींवर काँग्रेसने दावा केला आहे. असे 15 मतदारसंघ आहेत. त्यांचे ठरल्यावर ते आमच्यासोबत बैठक करणार असतील, तर आम्ही सुद्धा तयार आहोत. असे त्यांनी Prakash Ambedkar सांगितले.
 
27 मार्चला अकोल्यातून उमदेवारी भरणार
मविआच्या चर्चेचे गुर्‍हाळ सुरू असतानाच Prakash Ambedkar प्रकाश आंबेडकरांनी आपण बुधवारी अकोला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याची घोषणा करून मविआला धक्का दिला. आपण वंचित बहुजन आघाडीच्यावतीने हा उमेदवार अर्ज भरणार आहे. त्याआधी 27 मार्चला म्हणजेच बुधवारी पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात येईल, असे आंबेडकर म्हणाले.