डॉ. अतुल गावंडे यांची क्रीडा संकुलास भेट

    दिनांक :26-Mar-2024
Total Views |
- लॉनटेनिस खेळत घेतला आनंद

उमरखेड, 
कै. आत्माराम गावंडे यांचे पुत्र अमेरिकास्थित आणि अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी कार्य करणार्‍या संघटनेत जागतिक आरोग्य सहायक म्हणून कार्यरत असलेले Dr. Atul Gawande डॉ. अतुल गावंडे हे अमेरिका आणि भारत आरोग्य भागीदारी निमित्त आले आहेत. यावेळी त्यांनी येथील नगर परिषदच्या रोटरी क्लब संचालित बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुलास सदिच्छा भेट दिली आणि तेथे लॉन टेनिस खेळण्याचाही आनंद घेतला.
 
 
y26March-Gawande-Bhet
 
Dr. Atul Gawande : या दरम्यान, डॉ. गावंडे यांनी टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस खेळणार्‍या सर्वांशी हितगुज केले. विशेष म्हणजे, साठ वर्षीय वरिष्ठ पत्रकार अशोक गांजेगावकर नियमित जिममध्ये जातात त्यांचे कौतुकही केले. त्यांची भेट उमरखेडवासींसाठी नवीन नाही. कारण आत्माराम गावंडे हे मूळचे उटी गावचे असून त्यांची दोन अपत्ये आहेत. त्यांनी तिसरे अपत्य येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयास मानले आहे. त्यामुळे गावंडे परिवार हा या निमित्ताने येथे येत असतो. डॉ. अतुल गावंडे यांनी या क्रीडा संकुलाचे भरभरून कौतुक केले. यावेळी डॉ. सुनील बंग, डॉ. धनंजय व्यवहारे, चेतन माहेश्वरी, जितेंद्र उत्तरवार, सचिन टवाणी, संतोष बंग, पवन टवाणी, सुरेंद्र कोकडवार, बाळासाहेब भट्टड, प्रा. बाळासाहेब चिंचोळकर, प्रा. डॉ. राजेश डहाके, क्रीडा संचालक प्रा. डॉ. सावरकर, विनोद भारसाकळे प्रामुख्याने उपस्थित होते.