मतदारांना ओळख पटविण्यासाठी घेऊन जावे लागणार ओळखपत्र

    दिनांक :26-Mar-2024
Total Views |
हदगाव, 
लोकसभा सावित्रिक निवडणूक 2024 ला होणार्‍या निवडणुकीच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर ज्या मतदारांना छाया चित्रासह Voter ID Card मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहे ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. तर जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी शासनाने नमुद केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करू शकणार आहे.
 
 
voter id card
 
Voter ID Card : यासाठी आधारकार्ड, मनेरागा जॉबकार्ड, बँक, पोस्ट ऑफिसचे छाया चित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजने अंतर्गत आरोग्य विमा स्मार्टकार्ड, वाहान चालक परवाना, पॅनकार्ड, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्यूलोशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्टकार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक‘म, पब्लीक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचार्‍यांना दिलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना, आमदारांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या समाजिक न्याय सक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र यापैकी एक असावे, असे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे, तहसिलदार तथा सहायक निवडणूक अधिकारी विनोद गुंडमवार, निवडणूक नायब तहसीलदार जीडी हराळे, महसूल सहायक वैभव घोडे यांनी माध्यमकक्ष प्रमुख अनिल तामसकर, सहायक अनिल दस्तूरकर यांच्या मार्फत सांगितले आहे.