आष्टी,
water animal सध्या दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पशु पक्षांचे हाल होत आहेत. पशु पक्षांचे होणारे हे हाल लक्षात घेऊन चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव चेतन कोकावार यांनी पुढाकार घेऊन येथील युवकांनी गावातील झाडांना पानवटे बांधून पशु पक्षांसाठी पाण्याची सोय केली आहे.
सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे पक्षु-पक्षी व वन्य प्राणी यांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन भेंडाळा येथील तरुणांनी एकत्र येऊन पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उदात्य हेतुने झाडांना पानवटे बांधून पक्षांना कायमस्वरुपी पिण्याचे पाणी मिळेल, असे योग्य नियोजन करून गावांतील झाडावर पानवटे बांधण्यात आले आहेत. ग्रामस्थानीही या उपक्रमाला साथ देत नियमित या पानवट्यात पाणी भरून ठेवत आहेत.water animal युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे यांनी पक्षांसाठी घरासमोर पाणी भरून ठेवावे, असे आवाहन केले आहेत. दरवर्षी भेंडाळा येथील तरुणांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. राहुल वैरागडे यांच्या मार्गदर्शनातून गेल्या सहा वर्षापासून जिल्ह्याच्या विविध भागात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा, मनोरंजन असे उपक्रम जीवन वासेकर, कृष्णा चलाख, सुबिर मिस्त्री, भूषण नंदगिरीवार, विहान सातपुते, अर्जित दास, यश गुरु, साहिल वासेकर, भैरव चलाख, कार्तिक बोरकुंटवार, अनिकेत वैरागडे, लक्ष्मण चलाख, कुशल मडावी, रोहन वैरागडे, कृष्णा पाटील, सागर जुवारे, कृष्णा कंकलवार हे उपक्रम घेत असतात.