भाजप उमेदवाराला विजयाची खात्री नाही : आ. वडेट्टीवार
27 Mar 2024 18:45:43
गडचिरोली,
Vadettivar गडचिरोली-चिमूर निर्वाचन क्षेत्रातून भाजपने उमेदवारी देताना उशीर केला असून नाईलाजास्तव अशोक नेते यांना उमेदवारी दिल्या गेली असून या उमेदवाराला विजयाची खात्री नाही. त्यामुळे ही जागा काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान जिंकतील, असा अशावाद विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेतून व्यक्त केला आहे. या पत्रपरिषदेला काँग्रेस उमेदवार डॉ. नामदेव किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे, आमदार अभिजीत वंजारी, माजी आमदार अविनाश वारजूरकर, ज्येष्ठ नेते पेंटारामा तलांडी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रकाश इटनकर, समशेरखा पठाण, अरविंद कात्रटवार, वामनराव सावसाकडे, सतिस विधाते आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आपण मैदासनात उतरतो ते निवडणूक जिंकण्यासाठी केंद्र सरकार विरोधात जनतेच्या मनात रोष आहेच मात्र त्याहीपेक्षा जास्त रोष अशोक नेतेंना उमेदवारी मिळाल्यामुळे आहे. नेतेंनी आजवर दिसण्यासारखे एकही मोठे काम केले नाही. नेतेंना विकासाचे विझन नाही. मागील 10 वर्षापासून नेते खासदार असून गडचिरोली जिल्ह्याचा विकास करून शकले नाही. त्यामुळे भाजपच्या उमेदवार अशोक नेते विरोधात जनतेच्या मनात प्रचंड चिड आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. डॉ. किरसान यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या जनसागरात प्रचंड उत्साही दिसून आला.Vadettivar अर्धी निवडणूक तर आजच किरसान जिंकले आहेत असेही ते म्हणाले.