पुण्यातील आळेफाटा येथे बिबट्या थेट शिरला रुग्णालयात

    दिनांक :27-Mar-2024
Total Views |
- वनरक्षकासह तीन जखमी
 
पुणे, 
मंगळवारी रात्री एका Leopard बिबट्याने थेट पुण्यातील रुग्णालयातच प्रवेश केला. सुदैवाने रात्र असल्याने आणि रुग्णालयाच्या वॉर्डचे दरवाजे बंद असल्याने, दवाखान्यातून बिबट्या बाजूच्या इमारतीत घुसला. भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या खाजगी रुग्णालयाच्या इमारतीत पोहचला असावा, असा अंदाज आहे. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता.
 
 
Leopard
 
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी आले. बिबट्याच्या हल्यात एक दुचाकीस्वार आणि एक वनसंरक्षक जखमी झाला. बिबट्याने इमारतीतून लगतच्या पत्र्यावर झेप घेतली अन् तिथून शेजारच्या जंगलात पळ काढला. तब्बल तासभर चाललेला हा थरार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी गोळा झाली होती. 
 
 
आळेफाटा (ता. जुन्नर) चौकापासून जवळच असलेल्या वस्तीतून पुणे-नाशिक महामार्ग ओलांडताना बिबट्याने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला. यानंतर हा Leopard बिबट्या थेट जवळच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या रुग्णालयात घुसला. रुग्णालयाचे दरवाजे बंद असल्याने तसेच नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या शेजारी इमारतीत घुसला. यावेळी येथील रहिवाशांची घाबरगुंडी उडाली. सव्वा तासानंतर हा बिबट्या या बिल्डिंगमधून बाहेर पडला.