'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मराठी भाषा विश्व' कार्यशाळेचे आयोजन

    दिनांक :27-Mar-2024
Total Views |
नागपूर, 
Artificial Intelligence छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे मराठी भाषा विभागा अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मराठी भाषा विश्व या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी व्यासपीठावर प्रभारी प्राचार्या डॉ. अर्चना कहाळे पत्की, प्रमुख वक्ते,कृत्रिम बुद्धिमत्ता विशेष अभ्यासक अभिषेक आचार्य,  माजी प्रभारी प्राचार्य  पंकज झगडे आणि मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा. सायली लाखे पिदळी उपस्थित होते.
 
 
harhar
   
कृत्रिम वस्तूने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. तंत्रज्ञान आणि शिक्षणात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे.Artificial Intelligence परंतु, स्मार्ट उपकरणे आणि वेब आधारित अभ्यासक्रमाच्या वाढीव उपलब्धतेमुळे त्यांचा सध्याचा वापर नेहमीपेक्षा अधिक प्रचलित आहे. शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढीसह विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करण्यासाठी अनेक भिन्न मार्ग वापरले जात आहेत. येथे ए आय सह काही तंत्रज्ञान आहे जे आधीच प्रभावित करत आहेत आणि प्रत्येक प्रकारे शिक्षणावर सकारात्मक परिणाम करतील आणि म्हणूनच एआय कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ज्ञात करून घ्यावी, काळाची गरज लक्षात घ्यावी.असे, प्रतिपादन  अभिषेक आचार्य यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून  केले.
 
कार्यशाळेचे संपूर्ण नियोजनासाठी संस्थेचे सचिव डॉ. मारोती वाघ आणि संचालिका  लता वाघ यांचे मार्गदर्शन विशेषत्वाने लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लतिशा ककोडिया हीने Artificial Intelligence तर प्रास्ताविक मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा. सायली लाखे पिदळी यांनी केले आणि आभार प्रदर्शन सुमन यादव हीने मानले.तसेच, अध्यक्षीय मनोगत डॉ. अर्चना कहाळे पत्की यांनी मांडले. विद्यार्थ्यांचे प्रचंड उत्साहात कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली.
सौजन्य:प्रा. सायली लाखे पिदळी,संपर्क मित्र