युवकाच्या मृतदेहाने तालुक्यात खळबळ

    दिनांक :27-Mar-2024
Total Views |
- हत्या की आत्महत्या परिसरात चर्चेला उधाण
- नवरगाव धरणाजवळ आढळला मृतदेह

मारेगाव, 
Prajyot Moon : तालुक्यातील नवरगाव धरणाजवळ एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे मारेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाशेजारी विषाची बॉटल आढळून आल्याने ही हत्या की आत्महत्या याची चर्चा मात्र तालुक्यात सुरू आहे. तालुक्यातील नवरगाव धरण हे पर्यटनप्रेमींसाठी एक महत्त्वाचे साधन आहे. येथे अनेक प्रेमवीर आपली प्रेमाची भूक भागवण्यासाठी या धरणावर येत असतात. येथे प्रेमवीरांची नेहमीच मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. अशातच एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
 
 
y27March-Prajyot-Moon
 
हा युवक वणी तालुक्यातील रासा येथील असून त्याचे नाव Prajyot Moon प्रज्योत भीमराव मुन असून वय अंदाजे 22 आहे. तो वणी येथे आयटीआय करत होता असून कालच त्याचा वणी येथे पेपर होता अशीही माहिती आहे. प्रज्योतचे वडील बांधकाम ठेकेदारीचे काम करत असून त्याला दोन बहिणी आहेत. प्रज्योत हा एका औषधी दुकानात काम करायचा अशी माहिती आहे. त्याने आत्महत्या केली की हत्या करण्यात आली हे अजून कळले नसले तरी त्याच्या मृतदेहाशेजारी विषाची बाटली आढळून आल्याने ही आत्महत्या की हत्या अशी चर्चा मात्र तालुक्यात आहे. प्रज्योतच्या मृतदेहाचा मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पंचनामा करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास मारेगावचे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलिस करत आहेत.