हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे सेवन करुन सुरक्षीत रहा: जिल्हाधिकारी

    दिनांक :27-Mar-2024
Total Views |
गोंदिया,
elephantfoot जिल्ह्यातून हत्तीपाय रोगाबाबतची विकृती कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत 26 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान सामुदायिक औषधोपचार मोहिम गोंदिया, तिरोडा, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या तालुक्यात राबवली जात आहे. नागरिकांनी आरोग्य कर्मचार्‍यांसमोर गोळ्यांचे सेवन केल्याने हत्तीरोगाचा प्रतिबंध होऊ शकतो. त्यामुळे हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे सेवन करुन सुरक्षीत रहा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.
 

vibhag 
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 26 मार्च रोजी हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी नायर पुढे म्हणाले, जिल्ह्यात 2023 च्या सर्व्हेक्षणानुसार 733 हत्तीपाय रुग्ण तसेच 562 अंडवृध्दी रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या 2023 च्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रिटास डीशनल एमएफ सर्वेक्षणात अयशस्वी ठरलेल्या गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या चार तालुक्यात 26 मार्च ते 5 एप्रिल 2024 पर्यंत हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत आहे. हत्तीरोग हा डासांपासून होणारा रोग आहे. हत्तीरोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य विभागातर्फे मोहिम राबवून डीईसी व अल्बेंडाझॉल गोळ्यांचे वितरण करण्यात येत आहे.elephantfoot घरी आलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांकडून प्राप्त गोळ्यांचे सेवन त्यांच्या समक्ष करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले. यावेळी मंदा आनंद नागरीकर, मालनबाई भिकाजी बनकर व सिताराम गणपत सोनवाणे या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते एमएमडीपी किट वाटप करण्यात आली. तसेच हत्तीपाय आजाराबाबत जनजागृती साहित्यांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. डी. जायस्वाल, जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात व अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा हिवताप कार्यालयाचे पंकज गजभिये, किशोर भालेराव, आशिष बल्ले, रविंद्र त्रिवास, मिलिंद नंदागवळी, रविंद्र शेंडे, वर्षा भावे यांनी परिश्रम घेतले.