स्वच्छ प्रशासनाचे पितळ !

Kejriwal arrested-liquor scam दिल्लीचा कारभार ?

    दिनांक :28-Mar-2024
Total Views |
अग्रलेख
Kejriwal arrested-liquor scam कोणत्याही लाचलुचपतविरोधी पथकांकडून केल्या जाणाऱ्या कारवायांचा पूर्वी मोठा गाजावाजा व्हायचा, तेव्हा भ्रष्टाचार बोकाळल्याच्या चिंतेने सामान्य माणसाची झोप उडून जात असे. Kejriwal arrested-liquor scam सर्वसाधारणपणे सामान्यांस भ्रष्टाचाराचे वावडेच असल्याने कोणी एखादी व्यक्ती नेता होऊन भ्रष्टाचार निपटून काढण्याचा चंग बांधते तेव्हा समाजातील सर्वसामान्य माणसे त्याच्या पाठीशी आपल्या सदिच्छा आणि लोकशाहीचा हक्क असलेल्या मतांची ताकद उभी करतात. Kejriwal arrested-liquor scam दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मताधिक्याने भक्कम संख्याबळानिशी विजयी झालेल्या आम आदमी पार्टीकडे जनतेने याच नजरेने पाहिले होते. समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावरून छेडलेल्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याच्या बिनीच्या मोहऱ्याची जागा अरविंद  केजरीवाल यांनी घेतली आणि भ्रष्टाचाराविरोधात तरुणाई जागरूक असल्याच्या जाणिवेने समाज आश्वस्त झाल्याची खात्री होताच, Kejriwal arrested-liquor scam राजकीय पक्ष स्थापन करून अरविंद केजरीवाल यांनी सामाजिक मानसिकतेचा नेमका फायदा उठविण्याकरिता गळ टाकला.
 
 
Kejriwal arrested-liquor scam
 
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तेव्हाच्या शिवसेनेचे नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यावर मुंबईतील पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळाप्रकरणी कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांच्या मालमत्तांवर पडलेल्या धाडीतून तपास यंत्रणांना सापडलेली रक्कम साडेअकरा लाख रुपयांचीच असल्याचे उघड झाल्यावर तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राऊत यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची हवा काढण्याचा असाच प्रयत्न केला होता. Kejriwal arrested-liquor scam केजरीवाल यांनी जेव्हा भ्रष्टाचार निपटून काढून स्वच्छ व पारदर्शक राज्य कारभाराची ग्वाही देत निवडणुका लढविल्या, तेव्हा भ्रष्टाचाराची चीड असलेल्या मतदारांनी त्यांना सत्तेचा कौल दिला. स्वतः केजरीवाल यांनी अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा झेंडा खांद्यावर घेतलेला देशाने पाहिला होता, त्यामुळे त्यांच्या आश्वासनास कृतीची जोड असेल, असा विश्वास त्यामागे होता. Kejriwal arrested-liquor scam प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा प्रभावी वापर करून जनजागृती करणाऱ्या या नेत्याला मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले, तेव्हा तर जनतेच्या अपेक्षांची उंची अधिकच वाढली. २०१२ मध्ये आम आदमी पक्षाची स्थापना करून २०१३ मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरून जनतेच्या विश्वासाची चाचपणी करणाऱ्या  या नेत्याला अनुकूल कौल मिळाला.
 
 
 
२०१५ च्या निवडणुकीत दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवून विक्रम नोंदविणाऱ्या या नेत्याचे स्वच्छ कारभाराच्या आश्वासनाचे आणि कार्यकर्ता या नात्याने तळमळीचा मुखवटा घेतलेल्या त्या रूपाचे पुढच्या जेमतेम १० वर्षांतच पितळ उघडे पडावे आणि राजकारणातील चांगुलपणाच्या जनतेच्या विश्वासास हरताळ फासला जावा, असे चित्र या नेत्याच्या पक्षाने आणि त्याच्या राजकारणाने रंगविले आहे. Kejriwal arrested-liquor scam केजरीवाल यांच्यावर सध्या सुरू असलेली कारवाई, त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, त्यांच्या आलिशान महालावरील कोट्यवधींची उधळपट्टी आदींमुळे आपल्याच प्रतिमेवर शिंतोडे उडवून घेण्याचा आगळा प्रकार केजरीवाल यांच्या वर्तमानकाळाने जगासमोर आणल्याने त्यांच्या पूर्वेतिहासाची ही उजळणी आवश्यक ठरते. एखाद्या सराईत आर्थिक गुन्हेगारानेही अचंब्याने तोंडात बोटं घालावी, अशा बेमालूम घोटाळ्यांची काही उदाहरणे देशाच्या सत्ताकारणात अनेकदा उमटली. Kejriwal arrested-liquor scam केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने मद्य धोरण नावाचे धोरण दिल्लीत सुधारित स्वरूपात नव्याने अंमलात आणले आणि केजरीवाल यांच्यासह त्यांच्या निकटवर्ती चेल्यांनी या धोरणाआडून सत्ताकारणासाठी अफाट माया गोळा केली, असा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी तपास यंत्रणांनी समन्समागून समन्स बजावली तरीही केजरीवाल यांनी त्याला दाद दिली नाही.
 
 
Kejriwal arrested-liquor scam तब्बल पाच महिने तपास यंत्रणांनी प्रतीक्षा करूनही केजरीवाल चौकशीसाठी या यंत्रणांकडे फिरकलेच नाहीत आणि अखेर अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या गुरुवारी, २१ मार्चच्या रात्री त्यांना अटक करताच, निवडणुकांच्या तोंडावर कारवाई केल्याचा कांगावा करत त्यांच्या पाठीराख्यांनी केंद्र सरकारवरच हल्ले चढविण्यास सुरुवात केली. परवाना शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेऊन मद्य उद्योगाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ मिळवून देताना सरकारच्या तिजोरीत जाणारा महसूल अन्यत्र वळवून सरकारी तिजोरीचे सुमारे १४० कोटींचे नुकसान केल्याचा आरोप केजरीवाल सरकारवर आहे. Kejriwal arrested-liquor scam त्यांच्याअगोदर त्यांच्या पक्षाचे तीन बडे नेतेही याच प्रकरणात तुरुंगाची हवा खात असून वेळोवेळी केलेल्या याचिकांनंतरही न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळालेला नाही. केजरीवाल यांच्या अटकेचे पडसाद तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले. अमेरिका आणि जर्मनीच्या आगंतुक प्रतिक्रियांमुळे या कारवाईला राजकीय रंग आला असला, तरी गुरुवारी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नाकारला आहे. केजरीवाल यांच्यावरील कारवाईस बळ देणारे सबळ पुरावे तपास यंत्रणांकडे असल्याखेरीज त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला नसता. Kejriwal arrested-liquor scam याआधी मनीष सिसोदिया यांच्या कोठडीतही न्यायालयाच्या आदेशांमुळे वारंवार वाढ झाली. केजरीवाल हे तर दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि तुरुंगात रवानगी झाल्यानंतर आता दिल्लीचा कारभार कसा चालणार, याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.
 
 
अशा वेळी तपास यंत्रणांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा महत्त्वाचा असतोच, पण त्यांच्या हेतूवर राजकीय प्रश्नचिन्हेदेखील उमटत असतात. म्हणूनच अशा प्रकरणातील आरोपांचा वेळीच सोक्षमोक्ष लावण्याची आणि हाती असलेल्या पुराव्यांनिशी कोणत्याही गुन्ह्याचा छडा लावून कायदेशीर कारवाईला योग्य ती दिशा मिळावी यासाठी तत्पर राहण्याची जबाबदारी तपास यंत्रणांची असते. कोठडीत रवानगी होताच केजरीवाल यांच्या काही व्याधींनी डोके वर काढल्याचे सांगण्यात येते. Kejriwal arrested-liquor scam तब्बल १० समन्सना वाटाण्याच्या अक्षता लावून आणि वेळोवेळीच्या चौकशीच्या कारवायांकडे पाठ फिरवून केजरीवाल यांनी तपास यंत्रणांच्या व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अखेर त्यांच्यावर अपरिहार्य असलेली अटकेची कारवाई झाल्यानंतर कोठडीत त्यांच्या मधुमेहाचा विकार बळावला आणि प्रकृती झपाट्याने खालावली, असे सांगत त्यांच्या पत्नी आता तुरुंगाबाहेरचा लढा लढून केजरीवाल यांच्या समर्थनाची हवा निर्माण करू पाहात आहेत. Kejriwal arrested-liquor scam कोणत्याही गैरव्यवहाराचे आरोप असलेला कोणताही नेता अशा आरोपांची कधीच कबुली देत नसतो. आपल्या निर्दोषत्वाचा वारंवार पुनरुच्चार करून सामाजिक सहानुभूतीचा अधिकाधिक फायदा मिळविणारे अनेक जण याआधी देशाने पाहिले आहेत.
 
 
 
केजरीवाल यांच्या पत्नीने त्यांच्या निर्दोषत्वाचा निर्वाळा देणारे वक्तव्य करताना, सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्नही बुधवारी केला होता. आपला देह तुरुंगात असला, तरी आत्म्याने देह सोडला असून तो जनतेच्या हिताची काळजी करण्यासाठी तुरुंगाबाहेर, जनतेसोबत आहे, असा काहीसा अगम्य आध्यात्मिक आणि सहानुभूती मिळविण्यासाठी पूरक ठरेल, असा संदेश केजरीवाल यांनी पत्नीमार्फत जनतेस दिल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. Kejriwal arrested-liquor scam जनतेच्या हिताची काळजी घेण्याच्या कर्तव्याचा भाग म्हणून, तुरुंगातूनच राज्य कारभार करण्याचा अजब पवित्राही त्यांनी घेतल्याचे दिसते. कोणत्याही सरकारमध्ये राज्य कारभार करणे ही केवळ सत्ताप्रमुखाची जबाबदारी नसते. ती सामूहिक जबाबदारी असते आणि त्यास सत्ताप्रमुख जबाबदार असतो. या न्यायाने, तुरुंगाच्या गजाआडून दिल्लीचा कारभार हाकण्याच्या त्यांच्या पवित्र्याकडे पाहिल्यास केजरीवाल हे दिल्लीतील आप सरकारचे एकखांबी तंबू बनू पाहतात, हे स्पष्ट दिसते. तुरुंगामधून प्रशासकीय कारभार, बैठका, भेटीगाठी किंवा सरकार या नात्याने घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांची पूर्वतयारी करणे कोणासही शक्य नसते. Kejriwal arrested-liquor scam यासाठीच त्यांच्या या पवित्र्यास नायब राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. आता या पेचातून मार्ग काढण्याची जबाबदारी न्यायालयाने नायब राज्यपालांवर सोपविली आहे. विवेकी राजकारणाच्या कसोटीचा काळ आता सुरू झाला आहे आणि केजरीवाल प्रकरण हे त्याचे निमित्त ठरले आहे.