नागपूरकरांना ‘रेकॉर्ड' बनवण्याची संधी

Nitin Gadkari-Nagpur गटातटाच्या नेत्यांची गळ

    दिनांक :28-Mar-2024
Total Views |
प्रासंगिक
 
- मोरेश्वर बडगे
Nitin Gadkari-Nagpur लोकसभेची नागपूरची निवडणूक यावेळी देशभर गाजणार आहे. लोकप्रिय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात तिसऱ्यांदा लढत आहेत. आपण विजयी होणारच! पण यावेळी पाच लाखांपेक्षा जास्त मतांनी मला विजयी करा, अशी विनंती ते करीत आहेत. Nitin Gadkari-Nagpur उमेदवारी अर्ज भरायला जाण्यापूर्वी झालेल्या सभेत गडकरींनी पाच लाखांच्या मताधिक्याची गोष्ट केली तेव्हा जमलेल्या हजारो कार्यकत्र्यांना गहिवरून आले. प्रचंड मतांनी निवडून द्या, असे उमेदवाराने म्हणणे नवे नाही. पण मतदारांपुढे नेमके पाच लाखांचे ‘टार्गेट' ठेवणे हे काहीतरी स्पेशल आहे. Nitin Gadkari-Nagpur त्यामुळेच गडकरींनी मतदारांना घातलेले हे साकडे चर्चेचा विषय झाले आहे. मात्र, पाच लक्ष मतांची लीड ही सोपी गोष्ट नाही. गडकरींनाही त्याचा अंदाज आहे. गडकरींना २०१४ च्या निवडणुकीत २ लाख ८५ हजार मतांचा लीड होता.
 
 

Nitin Gadkari-Nagpur 
 
 
गेल्या निवडणुकीत तो थोडा घसरून २ लाख १६ हजारांवर आला. त्यामुळे आता पाच लाखांचा लीड घ्यायचा असेल तर निवडणूक एकतर्फी व्हावी लागेल, मतदानही भरघोस व्हावे लागेल. Nitin Gadkari-Nagpur गडकरींना याची जाणीव आहे. म्हणून की काय, प्रत्येक बुथवर ७५ टक्के मतदान हवे, असे ते जोर देऊन सांगत आहेत. हे शक्य आहे का? कारण आताशा राजकारणाचा चिखल झाला आहे. सामान्य लोकांना वीट आला आहे. त्यामुळे यावेळी मतदान कमी होण्याचा धोका आहे. अशात गडकरी ७५ टक्के मतदान मागत आहेत. तसा त्यांना विश्वास आहे. विकास कामांमुळे त्यांना हा विश्वास आला असणार. १० वर्षांत आपण एक लाख कोटी रुपयांची विकास कामे केली, असे ते सांगतात. Nitin Gadkari-Nagpur ती अतिशयोक्ती नाही. १० वर्षांत बदललेले नागपूर पाहून बाहेरचे लोक चाट पडतात. ज्या कारणासाठी लोक मुंबई-पुण्याकडे पळत होते त्या साऱ्या गोष्टी नागपुरात आल्या आहेत. तरीही निवडणूक म्हटली म्हणजे विरोधी पक्ष आलाच. गडकरींच्या विरोधात काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता. आमदार विकास ठाकरे यांना साऱ्या गटातटाच्या नेत्यांनी गळ घातली तेव्हा हायकमांडनेही सुटकेचा श्वास सोडला असेल.
 
 
Nitin Gadkari-Nagpur विकास ठाकरे आपल्या पद्धतीने लढत देतील. पण सवाल पाच लाखांच्या लीडचा आहे. पाच लाखांच्या लीडने आजवर कोणी निवडणूक जिंकले नाही अशातला भाग नाही. हा रेकॉर्ड पाच उमेदवारांच्या नावावर आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे यांनी बीडची पोटनिवडणूक ७ लाखांच्या लीडने जिंकली होती. हा रेकॉर्ड आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली मृत्यूमुळे झालेल्या या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्येला सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झाला. Nitin Gadkari-Nagpur दुसरा रेकॉर्ड बंगालचे माक्र्सवादी खासदार अनिल बसू यांच्या नावावर आहे. २००४ ची निवडणूक त्यांनी ५ लाख ९२ हजार मतांच्या लीडने जिंकली होती. पी. व्ही. नरसिंह राव हेही १९९१ मध्ये आंध्रमधील नंद्याळची निवडणूक ५ लाखांनी जिंकले होते. लोकजनशक्तीचे नेते रामविलास पासवान १९८९ ची निवडणूक जनता पक्षाच्या तिकिटावर पाच लाखांनी जिंकले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशातच नव्हे तर जगात लोकप्रिय आहेत. Nitin Gadkari-Nagpur मात्र, त्यांनाही पाच लाखांच्या या क्लबमध्ये अजून येता आलेले नाही.
 
 
Nitin Gadkari-Nagpur २०१४ ची निवडणूक मोदींनी ३ लाख ३७ हजार मतांनी जिंकली होती. गेल्या निवडणुकीत त्यांनी आपला लीड ४ लाख ८० हजार मतांपर्यंत वाढवला. पण मोदी पाच लाखांच्या आताच राहिले. अशातच गडकरींनी पाच लाखांच्या लीडचे टार्गेट ठेवल्यानंतर चर्चा सुरू झाली आहे. Nitin Gadkari-Nagpur पुन्हा लाख डॉलर्सचा प्रश्न आहे. विकास कामांच्या जोरावर लोक मते देतात का? या शाश्वत प्रश्नाचे उत्तर या निवडणुकीत मिळणार आहे. नागपूरला मोठी संधी चालून आली आहे. नागपूर हा एकेकाळी काँग्रेसचा गड होता. आज ती काँग्रेस आहे कुठे? आजची काँग्रेस म्हणजे भंडारा काँग्रेस झाली आहे. राहुल गांधींनी काँग्रेसचा बट्ट्याबोळ केला. उरलीसुरली काँग्रेस नाना पटोले यांनी संपवली. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर आज महाराष्ट्राचे राजकारण काही वेगळे राहिले असते. Nitin Gadkari-Nagpur  उद्धव ठाकरे ती खुन्नस ठेवून आहेत. राहुल गांधींनी दोन यात्रा काढल्या. मात्र, दोन यात्रा दरम्यानच्या काळात संघटनेवर फोकस ठेवला नाही. विकास ठाकरे धडाडीचे नेते आहेत, पण चुकीच्या पक्षात आहेत. ज्यांनी काँग्रेस बुडवली त्याच नेत्यांच्या आग्रहाला विकास ठाकरे बळी पडले. काँग्रेसकडे नेते आहेत. कार्यकर्ते नाहीत. या नेत्यांनाही अशोक चव्हाण व्हायला आवडते. तुम्ही थोडे थांबा. Nitin Gadkari-Nagpur पोळा फुटेल. या निवडणुकीनंतर वर्षअखेर विधानसभा निवडणूक आहे. तोपर्यंत काँग्रेस रिकामी झालेली असेल!
 
 
लढायला तुल्यबळ उमेदवार मिळणार नाही. चित्र बोलके आहे. ग्राऊंड लेव्हलवर काँग्रेसने ताकद गमावली आहे. त्यामुळेच नाना पटोले लोकसभा लढायला घाबरले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमधून आपल्या मुलीला तिकीट मिळावे यासाठी जोर लावला. त्यांना स्वतः लढायची हिंमत झाली नाही. Nitin Gadkari-Nagpur गडकरींचा आत्मविश्वास पोकळ नाही. त्यांनी केलेल्या विकासाच्या कामातून त्यांना तो मिळाला आहे. जनतेच्या याच विश्वासाच्या जोरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘अब की बार चारसो पार' म्हणत आहेत. चंद्रपूरच्या निवडणुकीला भावनिक वळण देण्याचा तिथल्या काँग्रेस उमेदवाराचा प्रयत्न आहे, पण ढसाढसा रडून उपयोग नाही. या अश्रूंना भुलाल तर पाच वर्षे रडायची पाळी येईल. देशाला जगाच्या शर्यतीत आणायचे असेल तर मोदींना आणि त्यांच्या महायुतीला स्पष्ट जनादेश द्यावा लागेल. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का? ही चर्चा खूप चालली. Nitin Gadkari-Nagpur सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी वंचितशी युती केली. पुढे वंचितला महाविकास आघाडीसोबत आणण्याचे प्रयत्न झाले. आंबेडकरांनी नवनव्या अटी-शर्ती घालून महाविकास आघाडीच्या नेत्यांना झुलवत ठेवले.
 
 
 
Nitin Gadkari-Nagpur ४० आमदार घेऊन आलेले अजित पवार ५-६ जागांवर समाधान मानतात. मात्र, एकही आमदार जवळ नसलेले प्रकाश आंबेडकर महाआघाडीला घाम फोडतात. याचा अर्थ स्पष्ट आहे, वंचितने खाल्लेल्या मतांमुळे गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या ८ जागा पडल्या होत्या. यावेळी आंबेडकरांना जवळ घेऊन मोठा गेम करण्याचा काँग्रेसचा डाव होता; मात्र ते व्हायचेच नव्हते. आता तिरंगी लढती होणार. तिरंगी लढतीत भाजपाचा फायदा होतो, हे सांगायला नको. आंबेडकर ही भाजपाची बी टीम आहे, असे आता ओरडून ओरडून बोलले जाईल. Nitin Gadkari-Nagpur आंबेडकरांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांना घेऊन नवी आघाडी बनवण्याची धडपड सुरू केली आहे. तेही शक्य नाही. मराठा समाजाचा एक-एक उमेदवार उभा करण्याचे मागेच ठरले आहे. जरांगे आता काही वेगळे करतो म्हटले तर मराठा आंदोलनात भांडणे सुरू होतील. आंबेडकरांनी आता स्वबळावर लढायचे ठरवले असे दिसते. त्यामुळे महायुतीने सुटकेचा श्वास सोडला असणार. मात्र, महाआघाडीच्या नेत्यांची शुगर वाढली आहे.