उद्धवराव आडनावाला तरी जागत चला...

Uddhav Thackeray-MVA उमेदवारांची यादीच जाहीर

    दिनांक :28-Mar-2024
Total Views |
वेध
 
- प्रफुल्ल व्यास
 
 
Uddhav Thackeray-MVA ठाकरे, ठाकरे आणि ठाकरे... या आडनावात सर्वच काही सामावलं होतं. आदर होता अन् अभिमानही होता. काय काय नव्हतं या आडनावात? आधी नावात काय असा प्रश्न विचारला जात होता. ठाकरेंनी आडनावातही काय? असा प्रश्न विचारला जावा अशी कामगिरी केली. Uddhav Thackeray-MVA मुंबई म्हटलं की फक्त बाळासाहेब ठाकरेच! दुसरा कोणीच नाही. सत्ताधारी असो की विरोधक सर्वांमध्ये आदरयुक्त वचक होता. उटपटांग कामं करणाऱ्यांना तर घामच फुटत होता. ‘उठाव लुंगी बजाव पुंगी' या सारख्या अनेक म्हणी त्यांनी तयार केल्या. Uddhav Thackeray-MVA हिंदू , भगवा या त्यांच्या दुखत्या नस होत्या. सत्ता गेली तरी पर्वा नाही पण तडजोड नाही, असा बाणेदार ‘वाघ' या अख्ख्या महाराष्ट्राने बघितला, अनुभवला! तो वाघ म्हणजे शिवसेनेच्या चिन्हातील नव्हे तर तो रुबाबदार असलेले हिंदुहृदयसम्राट प्रबोधनकार बाळासाहेब ठाकरे! Uddhav Thackeray-MVA या माणसाला मुंबईच्या रक्षणासाठीच ईश्वराने जन्माला घातले असावे, असेच वाटते. ते होते म्हणून मुंबई वाचली, असे आजही बोलले जाते.
 
 
 
Uddhav Thackeray-MVA
 
 
गेल्यानंतरही ज्याचे गुणगाण केले जाते तोच जीवन जगला असे म्हटले जाते. त्यात बाळासाहेब तंतोतंत बसतात. प्रत्यक्ष सत्तेत नसताना मुंबई महानगर पालिका ते राष्ट्रपती निवडणुकीतही बाळासाहेबांच्या शब्दाला मान होता. Uddhav Thackeray-MVA तो त्यांनी शेवटपर्यंत टिकवला. पुत्रमोहात झालेल्या चुकांची शिक्षा आता मात्र अख्खा महाराष्ट्र भोगतो आहे. राज की उद्धव हा विषय जेव्हा चिंतनात आला तेव्हाच बाळासाहेबांनी योग्य निर्णय घेतला असता तर आता शिवसेनेचे ‘खंडार' होण्याची वेळ आली नसती. असो, पुत्र मोह कोणाला सुटला तर बाळासाहेब त्याला अपवाद ठरतील? Uddhav Thackeray-MVA बाळासाहेबांमुळे महाराष्ट्राला एका सडेतोड, खंबीर आणि शब्दात वजन असलेल्या शिवसेना प्रमुखाची सवय झालेली होती. पण, बाळासाहेबांची चुकीची निवड तमाम शिवसैनिकांना भोगावी लागत आहे. महाराष्ट्रासाठी शिवसेनेची स्थापना करून हिंदुत्व जोपासणाऱ्या नेत्याच्या लेकरानं मात्र कंबरेचं सोडून डोक्याला बांधलं. गेल्या पंचवार्षिकमध्ये महायुतीत असताना आपल्या मित्र पक्षाला दिलेली वागणूक मंथरेसारखी होती. 
 
 
 
Uddhav Thackeray-MVA उणेदुणे काढण्यात आणि खिश्यात राजीनामा घेऊन फिरण्यातच त्यांनी पाच वर्षे काढली. त्यानंतर भाजपाचे नेते अमित शाह यांनी आपल्याला अडीच वर्षांची ‘कबुली' बंदद्वार दिल्यावरूनच खऱ्या अर्थाने युती दुभंगली. भाजपाने आम्हाला मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिल्याचे गेल्या महिन्यात झालेल्या जाहीर सभेत महालक्ष्मीची शपथ घेत उभ्या माणसाने आडवे हात करून सांगितले. Uddhav Thackeray-MVA शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांत नेमकी काय चर्चा झाली, ती त्या दोघांनाच माहिती. ठाकरे मात्र बेंबीच्या देठाला पीळ देत आम्ही खरे असल्याचे सांगत सुटले आहेत. त्यासाठी त्यांनी अगदी विरुद्ध विचारसरणी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतही घरोबा केला. हा सारा उपद्व्याप भाजपामुळे केल्याचे चित्र उभे केले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या दणक्यातून ते बाहेर आलेच नाही. Uddhav Thackeray-MVA या साऱ्या गोष्टींचा फुगा लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर फुटणारच होता, हे सत्य होते आणि तो फुटलाच! महायुती व महाआघाडीत अनेक पक्ष एकत्र आल्याने जागा वाटपात मतभेद होणे अपेक्षितच आहे.
 
 
परंतु, त्यात सामंजस्याची भूमिकाही घेणे प्रगल्भ राजकारण्याचे लक्षण म्हणावे लागेल. Uddhav Thackeray-MVA परंतु, महाविकास आघाडीत असलेल्या शिल्लक सेनेच्या मुखियांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या जागांचा विचार न करता आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करून टाकली अन् तेथेच ठाकरे शब्द पाळणारे नाहीत, हे स्पष्ट झाले. कालच्या त्यांच्या कृतीने त्यांनी भाजपाला दिलेलाही शब्द पाळला नाही, असेच म्हणावे लागेल. उबाठा गटाने उमेदवारांची घोषणा केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यात तीव्र नाराजी आहे. Uddhav Thackeray-MVA जागा वाटपावर एकमत झाले नसताना उबाठा प्रमुखांनी उमेदवारांची यादीच जाहीर करून टाकली. असेच उद्धवराव भाजपासोबतही वागले असतील. यावरून त्यांना सत्तेत येण्याची प्रचंड घाई झाल्याचे दिसून येते.
 
 
त्यांना पाणी देण्यासाठी संजय राऊत आहेतच. पिढ्या दर पिढ्या काही बदल अपेक्षित आहेत. परंतु, बाळासाहेबांचा बाणेदारपणा यांच्यामध्ये नाही. त्यामुळे उद्धवराव तुम्ही फक्त आडनावाचेच ठाकरे आहात काय हो! Uddhav Thackeray-MVA असा प्रश्न विचारावासा वाटतो. बाळासाहेबांसारखे हातवारे करून होणार नाही. बाळासाहेबांचा एकतरी गुण घेतला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. काल भाजपाचा विश्वासघात केला, आज महाआघाडीत फूट पाडली. हाच काय तुमचा स्वाभिमान? जिथे जाल तिथे उबजाल असेच काहीसे झाले आहे. Uddhav Thackeray-MVA तुम्ही महाआघाडीत आधीच उमेदवार जाहीर केल्याने शरद पवार यांचे डोळे उघडतील, अशी अपेक्षा करू या. काँग्रेसचे तर सध्या जहाज बुडालेलेच आहे. पण, उद्धवराव आडनावाला तरी जागत चला...
९८८१९०३७६५