खर्चाचा दररोज अहवाल पाठवा आणि बँकांचे स्टेटमेंट तपासा !

खर्च निरीक्षक अरूणराज आणि दास यांचे Wardha-ECI-Election2024 निर्देश

    दिनांक :28-Mar-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
वर्धा, 
 
Wardha-ECI-Election2024 निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून लोकसभा निवडणूक कालावधीत उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे सुक्ष्म निरीक्षण करावे, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक के. जी. अरूणराज आणि श्रीधर दास यांनी आज 27 रोजी दिले. Wardha-ECI-Election2024 वर्धा लोकसभा निवडणुकीची नामनिर्देशन प्रक्रिया आज 27 रोजी पासून सुरू झाली असून निवडणूक कामकाजातील खर्च विषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अधिकार्‍यांच्या बैठकीत त्यांनी सुचना केल्या. Wardha-ECI-Election2024 यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नुरूल हसन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी सुरज बारापात्रे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.Wardha-ECI-Election2024
 

Wardha-ECI-Election2024 
 
निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्ष व उमेदवाराचा होणारा खर्च दैनंदिन नोंदविणे आवश्यक आहे. सभा, प्रचार साहित्य, वाहन, अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या सभा, पोस्टर व बॅनर्स आदींचा खर्च निवडणूक खर्चात नोंदविणे गरजेचे आहे. Wardha-ECI-Election2024 बर्‍याच वेळा उमेदवार वस्तुस्थितीदर्शक खर्च नमूद करीत नाहीत. त्यामुळे सहाय्यक निवडणूक खर्च अधिकार्‍यांनी उमेदवार व पक्षाच्या खर्चावर लक्ष ठेवण्याचे निर्देश अरूणराज यांनी दिले. स्थायी निगराणी पथकामार्फत सुद्धा नियमित व्हिडिओ रेकॉर्डींग होणे आवश्यक आहे. रोख व मद्य पकडणे या घटनेची व्हिडिओ रेकॉर्डींग आवश्यक असून प्रत्येक घटनाक्रमाचा पुरावा गोळा करण्यात यावा. Wardha-ECI-Election2024 रोख पकडल्याची घटना निदर्शनास आल्यास या घटनेची माहिती तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक खर्च निरीक्षक व आयकर खात्याला द्यावी व त्या आधारेच पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
 
 
 
श्रीधर दास यांनी खर्चाशी संबंधित सर्व अहवाल दररोज निवडणूक खर्च शाखेस पाठविण्यात यावा. आपल्या परिसरातील बँकांमधून मोठ्या प्रमाणात रोख काढल्या गेली असल्यास त्याचीही चौकशी करण्यात यावी. Wardha-ECI-Election2024 निवडणूक काळात उमेदवारांनी आपल्या खात्यातून काढलेल्या रकमेचा तपशिल सादर करावा, उमेदवारांच्या सभा व प्रचार कार्य आदीची संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डींग करण्यात यावी. या व्हिडिओ रेकॉर्डींगची तपासणी करण्यात यावी. उमेदवारांनी सादर केलेला खर्च व रेकॉर्डींगमधील बाबी तपासूनच नियमित नोंद घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. Wardha-ECI-Election2024 केवळ उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची पडताळणी सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी यांनी आपल्या वैयक्तिक यंत्रणेमार्फत करावी, असे निर्देश खर्च निरीक्षकांनी यावेळी दिले.