डासांच्या अजेंड्यावर लढणार लोकसभा !

Wardha-mosquitoes गांधींच्या वेशभूषेत उमेदवारी अर्ज

    दिनांक :28-Mar-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
वर्धा, 
 
Wardha-mosquitoes सामान्य माणसांचे प्रश्‍न आणि वेगवेगळ्या समस्या निवडणुकीचे मुद्दे ठरतात. पण, गांधींचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या वर्धा जिल्ह्यात लोकसभेचा उमेदवारी अर्ज घेण्यासाठी Wardha-mosquitoes चक्क गांधींच्या वेशभुषेत आर्वीचा गांधी म्हणून ओळख असलेला प्रकाश उर्फ टिटू मोटवानी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. विशेष म्हणजे त्यांनी डासांचा मुद्दा घेत लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. Wardha-mosquitoes
 
 
 
Wardha-mosquitoes
 
 
61 वर्षीय टीटूने यांनी डासांना वर्धा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा चंग बांधला आहे. Wardha-mosquitoes आज उमेदवारी अर्ज घेतला असुन 2 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश उर्फ टिटू मोटवानी आर्वी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या घरी नगरपालिकेच्या नालीतून नेहमीच डासांचा त्रास असल्याने ते त्रस्त आहेत. Wardha-mosquitoes मोटवानी यांनी जिल्ह्यातील ही समस्या मुख्य समस्या लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
मोटवानी यांची समोसा विक्रीची दुकान असून ते सामान्य कुटुंबातील आहे. Wardha-mosquitoes लोकसभा निवडणूक लढण्याचे ठरवले. पण, पैसे नसल्याने आपण नागरिकांकडून पैश्याची जुळवाजुळव केली असल्याचे त्यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले.