स्थिरभ्रम - मनाची एक विकृती !

paranoia-German-massacre

    दिनांक :28-Mar-2024
Total Views |
जीवन जिज्ञासा
 
- प्राचार्य प्रमोद डोरले
paranoia-German-massacre घटना जर्मन देशातील सुमारे तीन दशकांपूर्वीची आहे. जर्मनीमधील एका विख्यात महाविद्यालयात अनेक वर्षे इंग्रजी शिकविणाऱ्या एका सीनिअर प्राध्यापकाची ही गोष्ट आहे. paranoia-German-massacre  त्याचे नाव आहे वॅग्नर. एक दिवस गंमत झाली. त्याचे असे झाले- नेहमीप्रमाणे प्राध्यापक महोदय महाविद्यालयात आले. त्यांनी आपल्या बॅगमधून छोटी मशिनगन काढली आणि महाविद्यालयातील गर्दी असलेल्या जागा म्हणजे व्हरांडा, वर्गखोल्या, प्राध्यापकांची खोली, (स्टाफ रूम) कॉलेजचे कँटिन, लायब्ररी या ठिकाणी त्यांनी बेछूट, अंदाधुंद गोळीबार केला. paranoia-German-massacre हे सर्व इतके अचानकपणे आणि अनेक वर्षांपासून परिचित असलेल्या व्यक्तीकडून घडत होते की, काही कुणाला त्याचा एकदम अंदाज येण्याचे कारणच नव्हते. त्याच्या या गोळीबारात सुमारे ३०-४० लोक प्राणास मुकले. आवश्यक ती धावपळ झाली. पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांनी वॅग्नरला पकडले. paranoia-German-massacre या सर्व प्रसंगातील अतिशय महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करण्यात आली होती आणि ती म्हणजे प्रा. वॅग्नर यांनी आपली रिकामी झालेली मशिनगन फेकून दिली.
 
 

paranoia-German-massacre 
 
 
शांतपणे ते स्टाफ रूममध्ये गेले आणि जणू काही घडलेच नाही, अशा निवांतपणे त्या दिवशी त्यांना पाठ्यपुस्तकातील जो धडा शिकवायचा होता त्याचे वाचन करीत बसले. त्या दिवशी त्यांना प्रसिद्ध साहित्यकार विल्यम शेक्सपिअर यांच्या अनेक प्रसिद्ध नाटकातील एक प्रसिद्ध नाटक ‘मॅकबेथ' शिकवायचे होते. paranoia-German-massacre ‘मॅकबेथ' याचे चरित्र वर्णन करायचे होते. शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र आणि पुढील पिढी घडविल्या जाणाऱ्या संस्कार क्षेत्रात हा प्रसंग, ही घटना घडल्याने सरकार, शिक्षण क्षेत्र, समाजमन हादरून गेले. हे का घडले? कशातून घडले? कशामुळे घडले याचा पूर्ण मागोवा घेण्याचे ठरविले. त्यासाठी एक समिती निर्माण करण्यात आली. त्या समितीत दोन सेवानिवृत्त न्यायाधीश आणि पाच मानसशास्त्रज्ञ असे एकूण सात लोक होते. समितीचे प्रमुख म्हणजे अनेक वर्षांपासून ‘अ‍ॅबनॉर्मल सायकॉलॉजी' या मानसशास्त्राच्या ब्रँचमध्ये संशोधन करणारे डॉ. आल्फ्रेड अ‍ॅडलर आणि डॉ. ब्लूलर या दोघांकडे जबाबदारी देण्यात आली. प्रा. वॅग्नरला त्यांच्या देखरेखीखाली मनोरुग्णालयात ठेवण्यात आले.paranoia-German-massacre
 
 
 
सुमारे वर्षभर अतिशय सखोल आणि सूक्ष्म स्तरावर प्रा. वॅग्नर यांच्या ‘केस'चा अभ्यास करण्यात आला. त्याचा रिपोर्ट तयार करण्यात आला. त्यातून मानवी मनाचे अतिसूक्ष्म, अचिंत्य आणि कल्पनातीत रहस्यमय स्वरूप प्रकट झाले. अतिशय शास्त्रीय पद्धतीने केलेल्या या केसचा ‘निष्कर्ष' काढण्यात आला. तो हा की, प्रा.वॅग्नर हा मनोरुग्ण असून तो ‘स्थिरभ्रम' (पॅरॉनॉईआ) या विकृतीने ग्रस्त आहे. पछाडलेला आहे. या विकृतीची मीमांसा त्यांनी केली. त्याचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करू...paranoia-German-massacre 
स्थिरभ्रम म्हणजे काय? स्थिरभ्रम कशाला म्हणतात? आत्मप्रतिष्ठेची भावना कोणत्याही व्यक्तीच्या ठिकाणी अतिरिक्त प्रमाणात बळावत गेली म्हणजे त्याच्या मनात भ्रमाचे काही पुंज गोळा होऊ लागतात. ते पुंज मोठे मजेशीर असतात. आत्मप्रतिष्ठेची वासना अतिरिक्त प्रमाणात बळावलेल्या माणसाची तो कार्यरत असलेल्या सर्वच क्षेत्रात- म्हणजे राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक- निरंकुश अशी सत्ता गाजविण्याची, प्रभुत्व गाजविण्याची सुप्त व अनिवार इच्छा आणि महत्त्वाकांक्षा असते. paranoia-German-massacre त्या दृष्टीने त्याच्या मनात काही भ्रामक भावपुंज (इल्युजनरी कनस्पेक्टस्) तयार होतात.
 
 
‘अमका मनुष्य माझा घात करू पाहत आहे.',‘माझं मोठेपण सहन होत नसल्यास माझ्याविरुद्ध सर्वत्र कारस्थान चालू आहे' अशा प्रकारांच्या भ्रम समुच्चयानं त्या माणसाचं मन एकदा का आवरीत झाले की, त्याची वाटचाल स्थिरभ्रमाकडे (पॅरॉनॉईआ) प्रारंभ झाली, असे समजावे. paranoia-German-massacre स्थिरभ्रमाकडे वळलेला माणूस आपल्या दैनंदिन जीवनात, कामात तसा नीटपणे (नॉर्मल) वागत असतो. पण वरवर साधारण दिसणारे त्याचे वागणे अंतरंगात मात्र याच विकृतीने बाधित असते. ही विकृती कोणकोणत्या टप्प्यांनी (स्टेजेस) वाढत जाते याचा मजेशीर तपशील डॉ. अ‍ॅड्लर आणि डॉ. ब्लूलर यांनी दिला आहे. त्यांच्या मते ही विकृती पुढील तीन अवस्थांमधून वाढत जाते वा विकसित होत जाते.paranoia-German-massacre
छळवाद भ्रांती (डिल्यूजन ऑफ परसिक्युशन) माणसाच्या मनात एकदा का या विकृतीने ठाण मांडले की, त्याचे वर्तन एखाद्या लाडावलेल्या हट्टी मुलासारखे व्हायला लागते. त्यातून त्याची आत्मकेंद्रित अवस्था निर्माण होते. त्यातून त्याचा अहंकार (इगो) पोसला जातो. ‘सगळ्यांनी आपलेच ऐकले पाहिजे', ‘आपण म्हणू त्याप्रमाणेच इतरांनी वागले पाहिजे,' अशी त्याची हट्टाग्रही तीव्र इच्छा निर्माण होते. paranoia-German-massacre त्याचा परिणाम म्हणजे ‘वास्तव आणि अवास्तव' यातील फरक त्याच्या बुद्धीला समजेनासा होतो. फक्त त्याचे आत्मकेंद्रित लक्ष स्वतःच्या राजकीय, सामाजिक प्रतिष्ठेपर्यंतच मर्यादित असते. त्यामुळे त्याचा त्या त्या क्षेत्रातील त्याच्या सोबत कार्य करणाऱ्यांशी सुसंवादाच्या ऐवजी विसंवादी आणि अहंकारामुळे वितंडवादी असेच नाते आणि वागणे असते. paranoia-German-massacre इतरांनी जर काही आक्षेपार्ह गोष्टी केल्या तर त्यासाठी अहंकाराने प्रताडन केल्या जाईल अशा गोष्टी करण्याचा आपल्याला मात्र अधिकार आहे. कारण आपण ‘फारच मोठे' आणि बाकीचे मात्र ‘लुंगे सुंगे' अशी इतरांच्या बाबतीतील ‘तुच्छता गंड' त्याचा स्थायीभाव झालेला असतो आणि त्याचा त्याला काही ‘खेद' आणि ‘खंतही' वाटेनाशी होते.
 
  
आत्मप्रतिष्ठेची हाव व हव्या असलेल्या लोकेपणेची अभिलाषा आणि त्या तुलनेत स्वतःचे सर्वच बाबतीत खुजे असलेले व्यक्तिमत्त्व यातील आंतरविरोध त्याच्या लक्षात असतो, पण ती वस्तुस्थिती लक्षात घ्यायला त्याचे अहंकारी मन तयार नसते. paranoia-German-massacre ती तापदायक जाणीव दडपून टाकण्यासाठी मग तो एक स्वतःचेच ‘वंचक समर्थन' (फाल्स रॅशनलायझेशन) तयार करून स्वतःबाबतचे एक भव्य-दिव्य उदात्त स्वप्नरंजनात मग्न होतो. याला अ‍ॅड्लरने श्रेष्ठतागंड भ्रांती असे म्हटले आहे.
श्रेष्ठतागंड भ्रांती (डिल्यूजन ऑफ ग्रँजर) अ‍ॅड्लरच्या मते ही स्थिरभ्रमाची दुसरी अवस्था असते. संपूर्ण जग आपला विरोध करते. लोकांना आपले मोठेपण (वास्तविक अस्तित्वातच नसलेले) सहन होत नाही, हे त्याचे गृहीतक असते. सगळीकडून आपला छळच होतो आहे, अशी त्याची स्वतःच निर्माण केलेली भ्रांत कल्पना असते. paranoia-German-massacre त्या कल्पनेला तोंड देण्यासाठी मग तो मनोमन आपल्या श्रेष्ठतेची, असीम गौरवाची, मोठमोठ्या मान-सन्मानाची, कर्तृत्वाची, लोकांकडून केल्या गेलेल्या भव्य-दिव्य सत्कारांची, सुखासह वाटणाऱ्या कल्पित पराक्रम गाथेची सुरम्य चित्रे रंगवू लागतो. एखाद्या दारूड्याप्रमाणे त्या सुखावह वाटणाऱ्या सुखद, तरल तंद्रीत झिंगू लागतो. त्यातच मग्न राहतो. स्वतःचेच लक्षावधी रुपये खर्च करून अशा प्रकारचे मोठे कार्यक्रम करणारे ‘पुढारी' याच अवस्थेतील समजावे.
 
 
 
स्व-केंद्रित संदर्भगंड (आयडियाज ऑफ रेफरन्स) paranoia-German-massacre
या अवस्थेत असलेल्या माणसाची वास्तवापासून मग फारकत होत जाते. तो आपल्याच विचारात सदैव गुंग होऊन राहतो. कोणाशीही बोलणे, चर्चा करणे हे त्याला रुचेनासे होते. त्याला शांत झोप येईनाशी होते. मनाची चलबिचल अवस्था होऊन कारण नसताना उदासीनता, विषण्णता त्याला जाणवते. हळूहळू त्याला काही भ्रम होऊ लागतात. आपल्या आसपासची माणसं आपल्याकडे काही साभ्रिपाय नजरेनं पाहू लागली आहेत, असे त्याला विनाकारणच जाणवू लागते. इतरांचे आपल्या बाबतीतील वर्तन बदलले आहे. हा त्याचा समज होतो. कुठेही, कोणी कोणत्याही विषयावर गप्पा करीत असले, तरी ते आपल्याच संबंधात चर्चा करीत आहेत, असा त्याचा गैरसमज होत राहतो. paranoia-German-massacre कुणी सहजही हसले तरी त्यांचे ते हसणे हे आपल्यालाच उद्देशून असले पाहिजे, असा निष्कर्ष तो मनोमन घेत राहतो. प्रत्येक व्यक्तीचा घटनेचा, प्रसंगाचा तो स्वतःशीच संबंध जोडत राहतो. त्यालाच ‘आयडियाज ऑफ रेफरन्स' म्हटले आहे. वरील तीनही अवस्था वॅग्नरमध्ये नकळत निर्माण झाल्या होत्या, असा निष्कर्ष डॉ. अ‍ॅड्लर आणि ब्लूलर यांनी काढला. त्याच्या आत्मनिवेदनातून हे प्रकट झाले.
 
 
paranoia-German-massacre ‘इंग्रजी साहित्याचा माझ्यासारखा अभ्यास कुणाचाच नाही' या अहंगडातून निर्माण झालेली स्थिरभ्रमाची (पॅनोरॉईआ) ही विकृती शेवटी तिसऱ्या अवस्थेला केव्हा गेली. ही स्वतः वॅग्नरपासून कुणाच्याच लक्षात आले नाही. कारण बाह्य जीवन तसे त्याचे नॉर्मलच वाटायचे. अंतरंगात मात्र तो या विकृतीचा हळूहळू बळी होत गेला. ‘मी इतका हुशार. इंग्रजी लिटरेचर शिकविण्यात माझ्यासारखा दुसरा कुणीही नाही. पण यांना त्याची कदर नाही.' paranoia-German-massacre ‘विद्यार्थीही मूर्खच आहेत. माझ्यापेक्षा यथातथाच ज्ञान असणाऱ्या इतर प्राध्यापकांचेच यांना कौतुक.' ‘मी स्टाफरूममध्ये, लायब्ररीत अखंड वाचन, अभ्यास करतो, पण त्यावेळी इतर प्रोफेसर्स चक्क सिगारेट पीत असतात, आपसात खिदळत असतात आणि माझ्याकडे पाहून काही तरी ‘कॉमेंट्स' करीत असतात. त्यांना माझ्या अभ्यासू वृत्तीचे कौतुक नाही; उलट ते परस्परांमधील ‘लुज टॉकिंग'ने ते माझी नक्कीच बदनामी करीत असतील.' हा छळ होणे आपण थांबविलेच पाहिजे... आणि वॅग्नरने त्या विकृतीचा बळी होऊन त्याच्या दृष्टीने छोट्या मशिनगनने तो छळवाद थांबविण्याचा प्रयत्न केला. paranoia-German-massacre विल्यम शेक्सपिअरच्या नाटकातील प्रसिद्ध पात्रे म्हणजे हॅमलेट, ज्युलियस सीजर, मॅकबेथ! मॅकबेथने संशयामुळे आपल्या पत्नीचा खून केला. निकाल देणाऱ्या जजची कमेंट होती. ‘‘इट सीम्स मॅकबेथ हिमसेल्फ हॅज केम टु जजमेंट...!''