बँकेचा हप्ता भरण्यासाठी शेतकर्‍यांची धावाधाव

सोयाबीनचे भाव उतरले तर कापूसही हलक्या भावातच

    दिनांक :29-Mar-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
bank installments यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. परंतु यावर्षी कापसाचा उतरता भाव व सोयाबीनला असलेला अत्यल्प भावामुळे शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान मार्च एंडिंगमुळे घेतलेले कृषी कर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू असून पीकांना भाव नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
 
 
bank installments
 
अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीन व कापसामध्ये भाव वाढ होईल या आशेने सोयाबीन व कापूस घरात ठेवले होते. मात्र आता सोयाबीन हे चार सव्वाचार हजारापर्यंत तर कापसाचा भाव सहा साडेसहा हजारापर्यंत आहेत. मागील खरीपाची सुरुवात कमी पाऊस, त्यानंतर पावसाचा खंड त्यातच विविध रोग यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न घटले. bank installments सोबतच हाती आलेले उत्पादनाला योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी कापूस व सोयाबीन घरातच ठेवले होते. सध्या पिकावर झालेला खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे.
बँकेचे कर्ज कसे भरायचे
शेतकर्‍यांनी बँकेचे कर्ज उचलून शेतीचा खर्च चालवला. तसेच उसणवारी आणून शेतीचा उर्वरित खर्च भागवला. परंतु आता बँकेचे कर्ज परतफेड करण्यासाठी व उसनवारी देण्यासाठी काही शेतकर्‍यांना कमी दरात सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. शेतकर्‍यांनी दर वाढेल या आशेवर सोयाबीन घरात साठवून ठेवले आहे. मात्र दर वाढत नसल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. मिळेल त्या भावाने सोयाबीनची विक्री सुरू असून शेतकर्‍यांना मात्र मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.