पुसदच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीचा राजीनामा! का ?
दिनांक :29-Mar-2024
Total Views |
- संचालक मंडळातील ‘त्या’ चार जणांच्या सभापतीला विरोधाची चर्चा
पुसद,
Krushi Utpanna Bazar Samiti : डबघाईला आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला संचालक मंडळ मिळून काही महिनेच उलटले. असे असताना कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीने राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या कारभारावर संचालक मंडळातील त्या चार जणांनी विरोध केल्याचीही चर्चा आहे. बंगल्यातून आलेल्या आदेशावरून 26 मार्च रोजी राजीनामा दिल्याची माहिती आहे.
अमोल माधव फुके असे सभापती पदाचा राजीनामा देणार्या सभापतीचे नाव आहे. पुसद येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना 1923 ची आहे. बाजार समिती ही ‘अ’ वर्गात मोडते. जवळपास 100 वर्ष जुनी बाजार समिती असून दोन दिवसांपूर्वी सभापतीच्या राजीनामामुळे सद्यस्थितीत समितीची अवस्था फार बिकट झाली आहे. पुसदच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 पैकी 18 जागा देखील निवडून आल्या होत्या.
Krushi Utpanna Bazar Samiti : 18 मे 2023 रोजी बाजार समितीच्या सभापतीपदी अमोल फुके यांची अविरोध निवड करण्यात आली होती. निवडणुकीत भाजपासह सर्व पक्षांचा पराभव झाला होता. बाजार समितीचा सभापती कोण होणार याकडे शेतकर्यांसह शहरातील विविध पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले होते. सभापतीपदी अमोल फुके यांची माजी कॅबिनेट मंत्री मनोहर नाईक यांच्या आदेशानंतर निवड करण्यात आले होती. सोबतच उपसभापतीपदी अभय राठोड यांची लॉटरी लागली होती. जवळपास दहा वर्षानंतर 18 मे 2023 रोजी निवड झाली होती. निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री मनोहर नाईक व भाजपाचे आमदार निलय नाईक यांच्या गटात अत्यंत चुरशीची लढत झाली होती हे विशेष.