देव मस्तकी धरावा

Samarth Ramdas Swami संदेशांचे वहन करण्याचे केंद्र

    दिनांक :03-Mar-2024
Total Views |
कानोसा 
 
-अमोल पुसदकर  
 
 
Samarth Ramdas Swami माघ कृष्ण नवमी ही समर्थ रामदास स्वामींनी समाधी घेतल्याची तिथी आहे. संपूर्ण भारतभूमी ही संत-महंतांची भूमी आहे. आपल्या देशामध्ये अनेक साक्षात्कारी संत होऊन गेले आहेत. Samarth Ramdas Swami महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्या सर्वांनीच जनतेला ईश्वर भक्ती व सदाचरण शिकविलेले आहे. परंतु ‘देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा' असे प्रत्यक्ष राजाला म्हणजे संभाजी महाराजांना पत्राद्वारे मार्गदर्शन करणारे संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी होत. समर्थ रामदासांनी टाकळी येथे केलेल्या तपश्चर्येनंतर संपूर्ण भारताचे भ्रमण केले. Samarth Ramdas Swami त्यावेळेस ठिकठिकाणी मुघलांचे राज्य होते व त्यांनी सर्वत्र अत्याचार चालविलेला होता. ठिकठिकाणी देवळे पाडली जात होती. ठिकठिकाणी लोकांना धर्मांतरित केले जात होते. स्त्रियांना पळवून नेणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, गुलामांच्या बाजारात विकणे, बादशहाच्या जनानखान्यामध्ये त्यांची भरती होणे हे सर्व प्रकार नित्याचे झालेले होते. Samarth Ramdas Swami हे सर्व पाहिल्यावर समर्थ म्हणतात, ‘किती सुंदरा हाल होऊनी मेल्या.' समर्थ रामदासांनी संपूर्ण समाजाची परिस्थिती पाहिली.
 
 
 
Samarth Ramdas Swami
 
 
सर्व समाजच गुलामीच्या मानसिकतेमध्ये होता. क्षत्रिय वृत्ती, पराक्रम या गोष्टी सर्वसामान्य जनतेमध्ये कमी झालेल्या होत्या. बेजबाबदारपणा वाढलेला होता. लोक लग्न करायचे व जबाबदारी वाढू लागली की बायका-मुलांना सोडून भगवे कपडे घालून संन्यासी बनवून फिरायचे. हे सर्व पाहून रामदास स्वामींनी समाजाला उपदेश केला... Samarth Ramdas Swami ‘आधी प्रपंच करावा नेटका!' छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधलेले होते. जनतेमध्ये उत्साह निर्माण झालेला होता. परंतु हा उत्साह टिकला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कार्यासाठी गावोगावचे तरुण सामील झाले पाहिजे यासाठी त्यांनी हनुमंताची उपासना करणे, व्यायामशाळेत जाऊन बलोपासना करणे याचा उपदेश तरुणांना केला. त्यांचे स्वतःचे शरीर व्यायामाने कमावलेले व पिळदार अशा पद्धतीचे होते. स्त्री-पुरुष सर्वांनाच भक्ती करता यावी अशा पद्धतीचा राम त्यांनी समाजाच्या समोर आराध्य दैवत म्हणून मांडला. Samarth Ramdas Swami समर्थांच्या शिष्यांनी घरोघरी जाऊन समाज प्रबोधन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कामासाठी गावोगावी वातावरण निर्माण केले. अनेक वेळा समर्थांचे मठ हे अनेक प्रकारच्या संदेशांचे वहन करण्याचे केंद्र होते.
 
 
या संशयावरून औरंगजेबाने त्याकाळी अनेक समर्थ शिष्यांना प्रताडित केले, दंडित केले व अनेकांना देहदंडाची शिक्षा दिली. समर्थ रामदासांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यक्रांती होण्यासाठी आवश्यक ते वातावरण बनविले. ‘सामथ्र्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे ।' हा संदेश त्यांनी लोकांना दिला. Samarth Ramdas Swami ज्यांचे शरीर पिळदार आहे, ज्यांच्या मनामध्ये देव आणि देश यांच्याबद्दल भक्ती आहे ते तरुणच व तो समाजच औरंगजेबाशी व सर्वच बादशहांशी टक्कर घेऊ शकेल, असा त्यांना विश्वास होता व तो सार्थही ठरला. आज ज्याला आपण सज्जनगड म्हणतो तो गड छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना अर्पण केला होता. गडाच्या व्यवस्थेसाठी काही गावे त्यांनी गडाला इनाम दिलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर स्वराज्याला खूप मोठा धक्का बसलेला होता. Samarth Ramdas Swami संभाजी महाराजांनी सूत्र आपल्या हाती घेतलेली होती. त्यावेळेस त्यांना अनेक प्रकारचा विरोध सहन करावा लागत होता. अशा परिस्थितीत समर्थ रामदास स्वामींनी त्यांना जे पत्र पाठविलेले आहे त्यातून समर्थ रामदासांची स्वराज्याबद्दलची चिंता प्रकट होते.
 
 
त्यात ते म्हणतात...Samarth Ramdas Swami
देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बुडवावा की बडवावा । स्वराज्या कारणे ।
देशद्रोही तितुके कुत्ते । मारोन घालावे परते ।
देवदास पावती फत्ते । यदर्थी संशयो नाही ।
धर्मासाठी झुंजावे । झुंझोनी अवघ्यासी मारावे ।
मारिता मारिता घ्यावे । राज्य आपुले ।
शिवरायास आठवावे । जीवित्व तृणवत मानावे ।
इहलोकी परलोकी राहावे । किर्ती रूपे । Samarth Ramdas Swami
महापुरुषांच्या qकवा कर्तृत्ववान पुरुषांच्या मुलांबद्दल समाजाची तशाच पद्धतीची अपेक्षा असते. छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असतानासुद्धा त्यांना घरातील विसंवादाचा सामना करावा लागला होता.
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर महाराजांच्या जवळ असलेल्या लोकांच्या बद्दल संभाजी महाराजांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे समज-गैरसमज निर्माण झाले. त्यातून त्यांनी अनेक लोकांना शिक्षा केल्या. या सर्व प्रकारामुळे स्वराज्याची हानी होऊ नये, लोक संभाजी महाराजांपासून दूर जाऊ नये यासाठी आपल्या स्वराज्याचे ध्येय काय आहे व आपण कशा पद्धतीने राज्य कारभार केला पाहिजे या संबंधातील पत्र समर्थ रामदास स्वामींनी संभाजी महाराजांना पाठविलेले आहे. देशद्रोहांच्या बाबतीत समर्थ रामदास स्वामींचे विचार फार प्रखर होते. Samarth Ramdas Swami त्यामुळेच देशद्रोह्यांंचा ‘कुत्रे' असा उल्लेख समर्थांनी केलेला आहे. आजच्या परिस्थितीतही देशद्रोह्यांसोबत आपण कशी वागणूक ठेवली पाहिजे, याचे समर्थ आपल्याला मार्गदर्शन करतात. संभाजी महाराजांचा मेहुणा गणोजी शिर्के याने दगाबाजी करीत केवळ जहागिरीसाठी संभाजी महाराजांना पकडून दिले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्याने त्यांना मुसलमान होण्यास सांगितले. संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान देणे स्वीकारले, परंतु ते मुसलमान झाले नाही.
 
 
Samarth Ramdas Swami ‘जीवित्व तृणवत मानावे । इहलोकी परलोकी राहावे । किर्ती रूपे ।' हा समर्थांचा संदेश त्यांनी आपल्या आचरणात आणलेला आपल्याला दिसून येतो. ‘धर्मासाठी झुंजावे । झुंझोनी अवघ्यासी मारावे ।' हा संदेश छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये उतरलेला आपल्याला दिसून येतो. मानवी शरीराला मर्यादा या असतातच. त्यामुळे आपले कार्य पूर्ण होत आहे, याची जाणीव झाल्यावर समर्थांनी माघ कृष्ण नवमी, १३ जानेवारी १६८१ या दिवशी समाधी घेतली. Samarth Ramdas Swami संत असूनसुद्धा लोकांना ईश्वर भक्ती सोबतच बलोपासना आणि परक्यांचे राज्य झुगारून देण्याचा तेजस्वी संदेश देणारे समर्थ रामदास हे अद्वितीय संत होते. मी गेल्यावर मी शरीर रूपाने राहणार नसलो, तरी ग्रंथरूपाने म्हणजे ‘दासबोध' या ग्रंथाच्या रूपाने मी राहणार आहे व सर्वांना मार्गदर्शन करणार आहे, अशा पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे. आजही त्यांचा दासबोध हा ग्रंथ संसारातील, समाजातील, राष्ट्रातील विविध समस्यांवर उपाय सांगणारा आहे. त्याचा अभ्यास सर्वांनी करावा व ‘शहाणे करोनी सोडावे सकल जन'Samarth Ramdas Swami