बळवंत वानखडे यांचे नामांकन दाखल

30 Mar 2024 21:10:31
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Balwant Wankhade : अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी मविआ समर्थित काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केला. त्यांनी नामनिर्देशन पत्राचे चार संच सादर केले.
 
 
jsAKFj
 
 
जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी त्यांचा अर्ज स्विकारला. यावेळी काँग्रेस नेत्या आ. यशोमती ठाकूर, उबाठाचे नेते माजी खा. अनंत गुढे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, राष्ट्रवारी शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रवीण राऊत उपस्थित होते.
 
दरम्यान अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 58 लोकांमर्फत 95 नामनिर्देशन पत्रांची उचल झालेली आहे. दोन नामांकन दाखल झाले आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
Powered By Sangraha 9.0