रेतीच्या ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा मृत्यू

30 Mar 2024 19:17:54
तभा वृत्तसेवा
लाखांदूर, 
Death of sand tractor driver : लिलाव झालेल्या खोलमारा/वाकल चूलबंद नदी घाटातून रेती वाहून नेत असताना ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा मृत्यू झाला. सदर घटना शुक्रवार 29 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली. शैलेश बाबुराव बगमारे(35) रा. तई, ता.लाखांदूर असे मृतकाचे नाव आहे.
 
 
fjSAKL
 
 
काही दिवसांपुर्वी वाकल खोलमारा रेती घाटाचा लिलाव करण्यात आला. त्यामुळे परिसरातील अनेक ट्रॅक्टर या घाटातून उपसा केलेली रेतीची इतरत्र साठेबाजी करीत आहेत. या रेती वाहतुकीच्या कामावर तई येथील शैलेश बगमारे यांचेही ट्रॅक्टर होते. दिवभर रेती वाहतूक केल्यानंतर सांयकाळी 4 वाजताच्या सुमारास डम्पिंगची रेती भरून आणत असताना ट्रॅक्टरवरून तोल जावून शैलेश मागच्या चाकाखाली सापडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र त्यावेळी तेथे एकही ट्रॅक्टर हजर नसल्याने उपचाराविना शैलेशचा मृत्यू झाला. घटनेची माहिती दिघोरी पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. मृत शैलेशला पत्नी व दोन मुले आहेत.
Powered By Sangraha 9.0