नागपूर,
Government decisions मद्यविक्री करणार्या आस्थापनांना देव-देवता, राष्ट्रपुरुष/ महनीय व्यक्ती आणि गड/किल्ले यांची नावे न देण्याबाबतच्या शासन निर्णयाची सर्वत्र अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे यांनी केली आहे.महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने ७ एप्रिल २०२२ रोजी परिपत्रक काढून संबंधितांना तसे निर्देश दिलेले आहेत. या निर्देशांची पाहिजे तशी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही, अशी खंत हरिहर पांडे यांनी व्यक्त केली आहे. याबद्दल प्रशासनात जागरूकता यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शासन परिपत्रकात देशातील महापुरुष/महनीय व्यक्ती या समाजासाठी आदर्श मार्गदर्शक आहेत. तसेच, गड/किल्ले हे राज्याचे सांस्कृतिक वैभव असून राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहे. Government decisions यामुळे परिशिष्टात असणार्या यादीतील नावे मद्यविक्री व मद्यपान सेवा दिल्या जाणार्या आस्थापनांना दिल्यास ती एक प्रकारे अवहेलना व वैभवशाली परंपरेस बाधा आणणारी ठरतात. यामुळे धार्मिक / सामाजिक / ऐतिहासिक श्रद्धास्थानांचे / आस्थांचे अवमूल्यन होते, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच यंदा २०२४पासून राज्य शासनाच्या परिपत्रकात महानुभाव पंथ प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या नावाचाही समावेश शासनाने केलेला आहे. या यादीमुळे प्रशासकीय अधिकार्यांना कार्यवाही करणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे देव-देवतांच्या संदर्भातील शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी हरिहर पांडे यांनी केली आहे.
सौजन्य:प्रत्युष दुबे, संपर्क मित्र