चीनने खैबरमध्ये तीन वीज प्रकल्पांचे काम रोखले

    दिनांक :30-Mar-2024
Total Views |
- 1500 कर्मचार्‍यांना मायदेशी बोलाविणार
 
इस्लामाबाद, 
Khyber Pakhtunkhwa Power Plant : पाकिस्तानच्या शांगला जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी चिनी अभियंत्यांच्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 अभियंते ठार झाल्यानंतर चिनी कर्मचारी दहशतीत आहेत. मृत्यूच्या छायेखाली काम करता येत नसल्याचे अनेक कर्मचार्‍यांनी आपल्या वरिष्ठांना सांगितले. यानंतर चीनने मोठे पाऊल उचलत खैबर पख्तुनख्वामधील तीन प्रकल्पांवरील काम थांबवले आहे. सोबतच चीन आपल्या सुमारे 1500 नागरिकांना मायदेशी बोलाविणार आहे. पाकिस्तानी अधिकार्‍यांना या निर्णयाबाबत कळविण्यात आले आहे. आम्ही आणखी जोखीम घेऊ शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. तिन्ही प्रकल्प 9860 मेगावॅटचे आहेत.
 
 
Khyber Pakhtunkhwa Power Plant
 
Khyber Pakhtunkhwa Power Plant : 4320 मेगावॅट क्षमतेचा दासू धरण प्रकल्प कोहिस्तान जिल्ह्यात आहे. हे पेशावरपासून 350 किमी अंतरावर आहे. मारले गेलेले अभियंते याच ठिकाणचे होते. 741 चिनी आणि 6,000 स्थानिक कर्मचारी आहेत. चिनी नागरिकांना बाहेर काढले जात आहे. पुढील आदेश येईपर्यंत स्थानिक कर्मचार्‍यांना घरी जाण्यास सांगण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर चिनी कामगार घाबरले असल्याचे प्रकल्पाच्या अधिकार्‍याने सांगितले. स्वात नदीवर असलेले धरण यावर्षी पूर्ण होणार आहे. 740 मेगावॅट जलविद्युत निर्माण होईल. तेथे 250 चिनी कर्मचारी काम करीत आहेत. या प्रकल्पांशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, दासू आणि दियामेर-भाषा धरणांमधून चिनी नागरिकांना लष्करी हेलिकॉप्टरने किंवा रस्त्यावर संचारबंदी लागू करून बाहेर काढले जाईल. चिनी नागरिक लवकरच पाकिस्तानमधून चीनला जाऊ शकतात.