ही निवडणूक माझी नाही तर जनतेची

संजय देशमुख : मंगळवारी करणार नामांकन दाखल

    दिनांक :30-Mar-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Leader Sanjay Deshmukh : होऊ घातलेली लोकसभेची निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. त्यामुळे मी उमेदवार असलो तरीही ही निवडणूक जनतेची झाली आहे. मंगळवारी, २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांच्या उपस्थित मी नामांकन दाखल करणार असल्याची माहिती यवतमाळ-वाशिम लोकसभेचे उमेदवार उबाठा शिवसेना नेते संजय देशमुख यांनी शनिवार, ३० मार्च रोजी झालेल्या पत्रपरिषदेत दिली.
 
 
y30March-Sanjay-Deshmukh
 
 
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख किशोर इंगळे यांच्यासह उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना संजय देशमुख म्हणाले, मी यवतमाळ-वाशिममध्ये नागरिकांच्या भेटी घेत आहे. मला मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. वाशिममध्ये गावातील मंडळी माझे ढोलताश्यात स्वागत करत आहेत. लोकांच्या मनात या सरकारच्या विरोधात रोष आहे, हे दिसून येत आहे.
 
  
मंगळवारी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, माणिकराव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल करणार आहे. यावेळी पोस्टल ग्राऊंड येथे सकाळी ११ वाजता सभासुद्धा होणार असल्याचे यावेळी सांगितले.