तभा वृत्तसेवा
घाटंजी,
Prabodhankar Sopan Kanerkar गिलाणी महाविद्यालय समोरील छत्रपती चौक येथे छत्रपती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती गुरुवार, 28 मार्च रोजी साजरी करण्यात आली. यावेळी युवा प्रबोधनकार सोपान कानेरकर यांनी आपल्या दमदार वाणीतून प्रबोधन करीत असताना त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीची चिंता व्यक्त केली. तरुण वर्गाला जे पाश्चात्त्यांचे लागलेले वेड व विविध प्रकारचे ‘दिन’ साजरे करीत आपल्या संस्कृतीची जोपासना करायचे सोडून तिचे धिंडवडे काढत असल्याबद्दल त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.

आपल्या प्रबोधनवाणीतून घाटंजीकरांना अवगत केले की, आपली संस्कृती एवढी पवित्र आहे की, ती आपल्याला यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग दाखवित असल्याने आज जगातील अनेक देश आपल्या संस्कृतीचा अभ्यास करीत आहेत. एवढ्यावरच न थांबता पाश्चात्य देशांनी भारतीय संस्कृतीचे आचरण करायला सुरुवातसुध्द्ा केली आहे. परंतु आपला भरकटलेला तरुण वर्ग मात्र दिशाहीन होऊन उलट पाश्चात्य संस्कृतीचे धडे गिरवत असल्याबद्दल कानेरकर यांनी खंत व्यक्त केली. Prabodhankar Sopan Kanerkar सोपान कानेरकर यांनी तरुण पिढीला अनेक ऐतिहासिक दाखले देत अवगत केले की, आपल्या संस्कृतीची नाळ सैल करू नका तर तिची नाळ घट्ट करा. केवळ शिवजयंती आली की, सामाजिक कार्य करण्याचा आव आणणे, ही शिवजयंती नसून ज्या दिवशी भरकटलेला देशातील तरुणवर्ग जागेवर येवून छत्रपतींचे गुण अंमलात आणेल, त्या दिवशी खरी शिवजयंती साजरी होईल.
तरुणींना व महिलांनाही त्यांनी आवर्जून सांगितले की, झाकलेली वस्तू सुरक्षित असते, तर उघडी राहिली तर यावर अनेक विध्वंसक प्रवृत्तीच्या माश्या बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे आपणच ठरवायचं आहे की आपली रहनसहन, वेशभूषा कशी असायला हवी. ‘जशी दृष्टी तशी सृष्टी’ या नियमांनुसार दृष्टी असावी माझ्या राजासारखी, जे परस्त्री मातेसमान मानत होते. असे अनेक प्रभावी व ज्वलंत ऐतिहासिक दाखले देत घाटंजीकरांना त्यांनी उद्बोधित केले. याप्रसंगी निवृत्त उपविभागीय अभियंता विनायक ठाकरे, खुशाल नागपुरे (वृद्धाश्रम आर्णी), ओंकार प्रफुल सिडाम (स्केटिंग सुवर्णपदकप्राप्त) व सूरज हेमके (अनाथांचा नाथ माणुसकीची भिंत) यांच्या कार्याचा शिवतैलचित्र देवून गौरव करण्यात आला. कार्यक‘माचे संचालन कैलास राऊत यांनी, तर आभार वैभव मलकापुरे यांनी मानले. कार्यक‘मासाठी निखिल देठे मित्र परिवार व छत्रपती महोत्सव समितीने परिश्रम घेतले.