केक खाल्ल्याने 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

    दिनांक :31-Mar-2024
Total Views |
पटियाला, 
girl dies after eating cake पंजाबमधील पटियाला येथे 10 वर्षांच्या मानवी या मुलीचा वाढदिवसाला ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाल्ल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कान्हा बेकरीच्या मालकावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, मानवी तिच्या मृत्यूच्या काही तास आधी केक कापताना आणि तिच्या कुटुंबासोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहे.  सीरियाच्या अझाझ प्रांतात कार बॉम्बस्फोट, 8 ठार

girl dies after eating cake
 
आजपासून नांदेडमध्ये विमान सेवेला प्रारंभ   मुलीच्या आजोबांनी सांगितले की, 24 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता त्यांनी तिचा वाढदिवस साजरा केला. त्या रात्री 10 वाजेपर्यंत संपूर्ण कुटुंब आजारी पडले. दोन्ही लहान मुलींना उलट्या होऊ लागल्या. girl dies after eating cake सुदैवाने सर्वात धाकटी मुलगी प्रेमन उलटी होऊन वाचली. मानवीची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. पण वाचवता आले नाही. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कान्हा बेकरीतून केक मागवला होता.