दानवेंनी पेढा भरवून खैरेंना दिल्या शुभेच्छा

    दिनांक :31-Mar-2024
Total Views |
- दोन्ही नेत्यांमधील वाद संपुष्टात
 
छत्रपती संभाजीनगर, 
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे आणि Ambadas Danve अंबादास दानवे यांच्यात सुरू असलेला वाद अखेर संपला आहे. अंबादास दानवे यांनी रविवारी चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी पोहोचत पेढा भरवून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
 
Ambadas Danve
 
मागील काही दिवसांपासून संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात दानवे विरुद्ध खैरे असा वाद पाहायला मिळत होता. दोन्ही नेते निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अशात आपण पक्षाचे काम करू, खैरे यांचे काम करणार नसल्याचे दानवे म्हणाले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटला नसल्याचे बोलले जात होते. मात्र, आज Ambadas Danve अंबादास दानवे यांनी खैरेंची भेट घेत त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी दानवेंनी खैरे यांना शाल आणि बुके भेट देऊन पेढा भरवला. त्यामुळे किमान लोकसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांमधील वाद संपला असल्याचे पाहायला मिळत आहे.
 
 
 
Ambadas Danve : अंबादास दानवे हे छत्रपती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी 2014 पासून इच्छुक असून, प्रत्येकवेळी त्यांना डावलले गेले आहे. एकाच पक्षात असतानाही चंद्रकांत खैरे यांच्याकडून सतत आपल्याला डावलण्यात येत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. अंबादास दानवे यांच्यामुळेच मागील लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाल्याचे अनेकदा चंद्रकांत खैरेंनी बोलावून दाखवले. चंद्रकांत खैरे यांनी मागील आठवड्यात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले, यावेळी दानवे यांना बोलावले नसल्याने हा वाद आणखीच वाढला होता. छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवारीवरून खैरे आणि दानवे यांच्यातील वाद एवढा वाढला होता की, थेट उद्धव ठाकरेंना मध्यस्थी करावी लागली होती.