मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ निवडणुक रिंगणात ?

Buldhana-Congress-Elections एप्रिल फुलची राजकीय चर्चा रंगली

    दिनांक :31-Mar-2024
Total Views |
बुलढाणा,
 
 
Buldhana-Congress-Elections लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थकांनी चार दिवसापूर्वी उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह करून राजीनामे स्विकृत करावे असा दबाव निर्माण केला होता. Buldhana-Congress-Elections  दरम्यान उबाठा शिवसेना गटाचे नरेंद्र खेडेकर यांना पक्षाने रितसर उमेदवारी घोषित झाली. आता राज्यात काही जागा मैत्रीपूर्ण लढतीत लढण्याचा निर्णय होणार असल्याने माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणुक रिंगणात राहण्याची शक्यता बोलून दाखविली आहे.Buldhana-Congress-Elections 
 
 
 
Buldhana-Congress-Elections
 
 
या संदर्भात काही माध्यमांमध्ये दिवसभर माजी आ. हर्षवर्धन सपकाळ अपक्ष लढणार असल्याचे वृत्त दिल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्यशी संपर्क साधला असता राज्यात लोकसभेची निवडणुक महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. Buldhana-Congress-Elections अद्याप उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कालावधी असून मैत्रीपूर्णचा निर्णय झाल्यास ठरवू असा सुचक संदेश त्यांनी बोलवून दाखविला. त्यामुळे महाविकास आघाडीतील दुफळी कायम असल्याचे दिसून येत आहे.
 
 
तर दुसरीकडे भाजपा लोकसभा निवणूक प्रमुख माजी आ. विजयराज शिंदे यांचीसुद्धा अपक्ष निवडणुक लढणार असल्याची चर्चा दिवसभर सोशल मिडीया माध्यमांवर सुरू होती. या संदर्भात त्यांच्याशी भ्रमण ध्वनीवर संपर्क साधला असता अद्याप निर्णय झाला नाही उद्या सांगतो, असे त्यांनी सांगितले. Buldhana-Congress-Elections आज एप्रिल फुल असल्याने पूर्वसंध्येलाच काँग्रेसचे माजी आ. हर्षवर्धन सपकाळ व माजी आ. विजयराज शिंदे दोनही माजी आमदार राजकीय चर्चेत आघाडीवर होते. त्यामुळे दिवसभर महाविकास आघाडी व महायुतीच्या घटकपक्षात उलट सुलट चर्चा होती.
 
 
प्रतापराव जाधव 2 एप्रिल रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज Buldhana-Congress-Elections 
बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव 2 एप्रिल मंगळवार रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेसाठी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील व शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे उपस्थित राहणार आहे. Buldhana-Congress-Elections ही सभा सकाळी 10 वाजता येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा, जिल्हा परिषदच्या पाठिमागे मैदानावर घेण्यात येणार आहे. रॅली सकाळी 10 वाजता शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील गांधी भवन येथुन काढण्यात येणार आहे.