एप्रिल फूल...!

History of April Fool Day मूर्ख बनविण्याचा दिवस

    दिनांक :31-Mar-2024
Total Views |
वेध
 
- अनिरुद्ध पांडे
History of April Fool Day एप्रिल फूल बनाया, तो उनको गुस्सा आया,
तो मेरा क्या कसूर, जमाने का क्या कसूर
जिसने दस्तूर बनाया...! History of April Fool Day साठ वर्षांपूर्वी म्हणजे १९६४ मध्ये आलेल्या ‘एप्रिल फूल' या चित्रपटातील गाण्याची आठवण १ एप्रिलला दरवर्षी येतेच. एप्रिल फूल या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातील हे महंमद रफी यांनी गायलेले धम्माल गाणे. History of April Fool Day चित्रपटाचा नायक विश्वजित आणि नायिका सायराबानू यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे त्याकाळी बऱ्यापैकी लोकप्रिय झाले होते. हसरत जयपुरी यांच्या या गीताला शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केले होते. या गाण्यापूर्वी नायक विश्वजित नायिका सायराबानूसमोर विजेचा शॉक बसल्याचे नाटक करतो आणि ‘एप्रिल फूल बनाया...' हे गाणे म्हणतो, अशी पृष्ठभूमी आहे. सुरुवातीला युरोपीय देशांनी पाच-सहाशे वर्षांपासून स्वीकारलेल्या आणि हळूहळू साऱ्या जगातच रूढ झालेल्या एप्रिल फूल या संकल्पनेवर भारतात चक्क ‘एप्रिल फूल' याच नावाने एक हिंदी  चित्रपट निघतो, यावरून त्यातील गंमत लक्षात येते.History of April Fool Day
 

History of April Fool Day 
 
History of April Fool Day पूर्वी जगात ज्युलियन कॅलेंडर वापरले जायचे त्याची सुरुवात १ एप्रिलपासून होती. पुढे ते जाऊन ग्रेगरियन कॅलेंडर आले. ‘ज्युलियन'च्या काही पाठीराख्यांना ग्रेगरियन कालगणना मान्य नव्हती. ते १ एप्रिलपासूनच वर्ष सुरू करायचे. त्यांचा तो हट्ट पाहून लोक ‘एप्रिल फूल्स' असा त्यांचा उल्लेख करू लागले, अशी नोंद आहे. अशा मूर्ख ठरलेल्यांना एका विशिष्ट आकाराच्या कागदाची टोपी करून घातली जायची. ती ‘फूल्स कॅप...!' त्या विशिष्ट आकाराच्या कागदाचेही नाव पडले ‘फूल्स कॅप' म्हणजेच आजचा आपला ‘फूलस्केप'. तो आकार ‘असा' ठरला आहे...! History of April Fool Day हा ‘एप्रिल फूल' दिवस संपूर्ण जगातच ‘मूर्ख बनविण्याचा दिवस' म्हणून साजरा करण्याची प्रथा, परंपरा आहे. सुमारे साडेसहाशे वर्षांपूर्वी या दिवसाची सुरुवात झाल्याची एक कथा आहे. सुरुवातीला हा दिवस प्रामुख्याने युरोपीय देशांमध्ये साजरा केला जायचा. राजा रिचर्ड व राणी अ‍ॅनी यांनी ३२ मार्च १३८१ या दिवशी आमचा साखरपुडा होणार असल्याची घोषणा केली. History of April Fool Day या घोषणेने इंग्लंडमधील जनता आनंदली, त्यांनी त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरवले. पण ३१ मार्चला लोकांच्या लक्षात आले की, ३२ मार्च ही तारीख तर नसतेच. आपण मूर्ख बनविले गेलो हे त्यांच्या लक्षात आले, ती तारीख होती १ एप्रिल. म्हणून १ एप्रिल हा मूर्ख दिवस, ‘एप्रिल फूल डे'. या दिवसाचे संपूर्ण जगात वेगवेगळे किस्से आहेत.
 
 
 
हा दिवस ‘असा' साजरा करण्यामागे निश्चित अशी सर्वमान्य घटना नाही. History of April Fool Day पण इंग्लंड किंवा युरोपीय देशांमधील ही प्रथा भारतात इंग्रजांनी आपल्या राजवटीत, म्हणजे १९ व्या शतकात रुजवली, क्रिकेट हा खेळ रुजवला तशी. आपण भारतीयांनीही ही प्रथा स्वीकारली आणि या ‘एप्रिल फूल'च्या दिवशी गमतीजमती करू लागलो. गेल्या दोनशे वर्षांमध्ये आम्ही भारतीय हा दिवस आपलाच दिवस, आपलीच प्रथा म्हणून अंगवळणी पाडून घेतला आहे. या ‘एप्रिल फूल'चे काही अजीबोगरीब किस्से जगभर चर्चिले जातात. History of April Fool Day डच टीव्हीची ‘पिसाचा झुलता मनोरा कोसळला' अशी बातमी, न्यूझीलंड टीव्हीची ‘सेलफोनवर बंदी' ही बातमी, २००३ मधली ‘बिल गेट्सची हत्या' ही बातमी, काहीही न करता ‘आजचे आमचे वृत्तपत्र सुगंधी आहे' असे सांगणे, अवकाशातील उपग्रह एका विमानतळावर उतरणार असे सांगून हजारोंची गर्दी जमवणे, असे शेकडो एप्रिल फूलचे किस्से आहेत. History of April Fool Day काही देशांमधील वृत्तपत्रे तर आवर्जून या दिवशी वाचकांची दिशाभूल करून हा दिवस मनवतात. भारतातही अनेक वृत्तपत्रे त्यात सहभागी होतात. पहिल्या किंवा शेवटच्या पानावर ‘एफुवा' म्हणजे ‘एप्रिल फूल वार्ताहर' असा उल्लेख करून बातमी टाकतात. वाचकही त्याचा आनंद घेतात.
 
 
‘तरुण भारत'नेही एका क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने रमेश फडनाईक यांनी अतिशय अप्रतिम शब्दबद्ध केलेली बातमी पहिल्या पानावर छापून धमाल उडवून दिली होती. History of April Fool Day इंग्लंडमधील ‘बीबीसी' जगात अग्रगण्य वृत्तवाहिनीने तर ‘एप्रिल फूल' ही संकल्पना चांगलीच उचलून धरली आहे. या बीबीसीने १९८० मध्ये लंडनमधील विश्वविख्यात ‘बिन बेन' या घड्याळाचा चेहरा आता काट्यांचा राहणार नसून तो डिजिटल होणार आहे. त्यामुळे जो कोणी पहिला संपर्क साधेल त्याला जुन्या, काढून टाकलेले घड्याळाचे काटे जिंकता येतील, अशा बातमीने ‘एप्रिल फूल' केले होते. १९६५ मध्ये बीबीसीनेच रेडिओच्या ध्वनिलहरींसोबत एक विशिष्ट प्रकारचा दुर्गंध सोडण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. History of April Fool Day इंग्रज लोकही इतके भारी की, अनेकांनी ‘या दुर्गंधाचा अनुभव घेतला' असे सांगून बीबीसीलाही ‘फूल' केले होते. ‘आज काही वेळ गुरुत्वाकर्षण निघून जाणार, हवेत तरंगण्याचा अनुभव घ्या,' अशी एप्रिल फूल बातमी बीबीसीनेच दिली होती. त्याहीवेळी अनेकांनी ‘आम्ही हा अनुभव एन्जॉय केला,' असे बीबीसीला कळवून चोरावर मोर केले होते. History of April Fool Day आहे की नाही मूर्ख बनण्यातही गंमत...!
९८८१७ १७८२९