तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर लष्कराचा भर

    दिनांक :31-Mar-2024
Total Views |
- लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह यांचे प्रतिपादन
 
पुणे, 
स्वदेशीकरण, तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि कारवायांची क्षमता वाढविण्यावर लष्कराच्या सदर्न कमांडचा भर राहणार आहे, असे सदर्न कमांडचे जनरल ऑफिसर Lieutenant General A. K. Singh कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंह यांनी सांगितले. 1 एप्रिल रोजी स्थापना दिवस साजरा करणारी सर्दन कमांड ही लष्करातील सर्वांत जुनी आणि मोठी कमांड आहे. ही कमांड 11 राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या भारताचा 41 टक्के भूभाग व्यापते. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत लेफ्टनंट जनरल सिंह यांनी 2024 या वर्षात लष्कराने परिवर्तनीय बदलासाठी उत्प्रेरक म्हणून तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या कमांडच्या वचनबद्धतेबद्दल सांगितले.
 
 
General A. K.
 
ही संकल्पना परिवर्तनीय बदलासाठी उत्प्रेरक महणून तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी तसेच आमच्या कारवाया आणि वाहतुकीच्या गरजांसाठी नवनवीन उपाय शोधण्यासाठी आणि देशांतर्गत संरक्षण उद्योगाच्या सहकार्याने या प्रकल्पांना आकार देण्यासाठी इन-हाऊस कौशल्ये वापरण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करते, असे सिंह म्हणाले. भारताच्या संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी सदर्न कमांडने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या उद्योग केंद्रांसह सहस्थित असल्याने आणि मोठ्या सं‘येने फिल्ड फायरिंग रेंज असल्याने दक्षिण कमांड विविध शस्त्रे, मंच, महत्त्वपूर्ण संरक्षण उपकरणे आणि अत्याधुनिक दारुगोळ्याच्या चाचणीसाठी काम करते, असे Lieutenant General A. K. Singh सिंह म्हणाले.
 
 
उत्पादनासाठी औद्योगिक भागीदारांना तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यासोबत दक्षिण कमांडने तयार केलेल्या सात नवकल्पनांच्या संपूर्ण लष्करात अंमलबजावणीसाठी निवड करण्यात आली आहे. उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रापर्यंत पोहोचवण्याचा एक भाग म्हणून राज्यनिहाय परिसंवाद सह-प्रदर्शने नियमितपणे आयोजित केली जातात. पुण्यात फेब‘ुवारी आणि मे महिन्यात आयोजिक कार्यक‘मात 150 उद्योग सहभागी होतात, असे Lieutenant General A. K. Singh सिंह यांनी सांगितले.