अमरावतीच्या महायुतीत रुसवे-फुगवे सुरूच

Navneet Rana-BJP-NCP छायाचित्र वापरल्याने संजय खोडके नाराज

    दिनांक :31-Mar-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
अमरावती, 
 
Navneet Rana-BJP-NCP भाजपाच्या नेतृत्वातल्या महायुतीचे घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व स्थानिक नेते संजय खोडके यांनी आपले छायाचित्र कोणतीही परवानगी न घेता भाजपा उमेदवार नवनीत राणा यांनी त्यांच्या पोस्टरवर वापरल्याने जोरदार आक्षेप घेतला आहे. Navneet Rana-BJP-NCP कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत नवाच वाद समोर आल्याने चर्चा होत आहे.
 

Navneet Rana-BJP-NCP 
 
 
संजय खोडके यांनी या संदर्भात एक पत्र, खा. नवनीत राणा यांना लिहले आहे. त्या ते म्हणतात, अमरावती लोकसभा निवडणुकीच्या आपल्या प्रचाराच्या पोस्टरवर आपण माझा फोटो लावला असल्याचे मला समजले. Navneet Rana-BJP-NCP ते पोस्टर सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल केले जात असल्याचे मला दिसले. सोशल मीडियावर किंवा पोस्टरवर माझा फोटो लावण्याची मला काहीही कल्पना नसून आपण माझा फोटो सोशल मीडियावर किंवा पोस्टरवर वापरण्याबाबत माझी व्यक्तिगत अनुमतीसुद्धा घेतलेली नाही. ही बाब निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारी आहे.Navneet Rana-BJP-NCP
 
 
 
करिता आपणास विनंती आहे की, लोकसभा निवडणूक प्रचारात माझ्या फोटोचा व नावाचा वापर करू नये. आपण माझ्या फोटोचा वापर ज्या-ज्या मीडियात केलेला आहे, तेथून त्वरित तो काढून मीडियामध्ये त्या संदर्भात आपण आपले निवेदन सोशल मीडिया व प्रिंट मीडियामध्ये करावे. याबाबत आपण माध्यमांमाधून निवेदन ( खुलासा) केले नाही तर मला कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल, असे त्यांनी पत्रात नमुद केले आहे. Navneet Rana-BJP-NCP या संदर्भात नवनीत यांच्याकडून वृत्त लिहेस्तोवर कोणताही खुलासा झालेला नव्हता. खोडके यांनी काढलेले पत्र समाजमाध्यमांवर जोरात व्हायरल होत आहे. माध्यमांनाही सदर पत्र त्यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे. नवनीत यांच्या उमेदवारीवरून महायुतीच्या घटकपक्षांमध्ये सुरूवातीपासूनच राजी-नाराजी आहे. त्यांना भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर हळुहळु आता ती एकेकाने उफाळून येत आहे. Navneet Rana-BJP-NCP पुढे आणखी काही मुद्दे समोर येण्याची शक्यता आहे.