गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील नक्षली कॅम्प उद्ध्वस्त: बघा व्हिडीओ

31 Mar 2024 18:16:26
गडचिरोली, 
Naxalite Camp Destroyed : गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील नक्षली कॅम्प उद्ध्वस्त करीत मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केल्याची कारवाई गडचिरोली पोलिसांनी ३० मार्चच्या सकाळी केली.
 
 
GAD NAX
 
 
कसनसूर, चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ (उप पोलिस स्टेशन पेंढरीपासून १२ किमी पूर्वेला) तळ ठोकून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
 
 
इथे बघा व्हिडीओ : गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील नक्षली कॅम्प उद्ध्वस्त!
 
 
या माहितीच्या आधारे अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकाच्या जवानांद्वारे सदर जंगल परिसरात अभियान राबविण्यात आले. सदर अभियान पथक शनिवारी सकाळी ४५० मीटर उंच टेकडीवर पोहोचले. त्यावेळी नक्षलवादी नुकतेच सदर ठिकाणहून निघाले होते. डोंगरमाथ्यावरील ठिकाणावर शोध मोहीम राबविली असता त्याठिकाणी माओवाद्यांचे एक मोठे आश्रयस्थान आणि छावणी सापडली. ती अभियान पथकाद्वारे नष्ट करण्यात आली. सदर जंगल परिसरात पुढील शोध सुरू करण्यात आला. परंतु नक्षली घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
 
 
घटनास्थळावरून कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर्स, जिलेटिन स्टिक्स, बॅटèया, वॉकी टॉकी चार्जर, बॅकपॅक आदी नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. सदर परिसरात नक्षल शोध अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0