कौटुंबिक नव्हे, वैचारिक लढाई : सुप्रिया सुळे

    दिनांक :31-Mar-2024
Total Views |
- सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून लगावला टोला
 
पुणे, 
माझ्यासाठी ही निवडणूक कौटुंबिक लढाई नसून ही एक वैचारिक लढाई आहे. इच्छा नसताना सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पवार कुटुंबात भांडणे लावण्याचे प्रकार सुरू आहे. मात्र जनता सुज्ञ असून काम करणारा उमेदवार कोण आहे, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे निवडणूक जिंकणार की नाही याची चिंता नसल्याचे मत शरद पवार गटाच्या उमेदवार Supriya Sule सुप्रिया सुळे यांनी रविवारी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले आहे.
 
 
Supriya Sule
 
Supriya Sule : सुप्रिया म्हणाल्या, आपण सर्वांनी एक गोष्ट कटाक्षाने लक्षात घेतली पाहिजे. अनेक दिवस झाले भाजपा हा पक्ष बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक बैठका घेत आहेत. त्यांचे नेते म्हणत आहे की, या निवडणुकीत शरद पवार यांना संपवायचे आहे. त्यांना विकास करायचा नाही. त्यांना शरद पवार यांना संपवायचे आहे. शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपाकडे कुठलाही उमेदवार नाही. म्हणून त्यांनी माझ्या वहिनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. हे मोठे षडयंत्र आहे. मतदारसंघातील उमेदवार हा डाव हाणून पाडणार असल्याचे त्या म्हणाल्या.
चेहरा नव्हे, काम पाहून मतदान करावे
माझ्यासाठी वैचारिक लढाई कुठल्या ही व्यक्तीशी नाही. मी वैयक्तिक टीका केलेली नाही. महागाई, बेरोजगारी, दडपशाही विरोधात माझी लढाई असणार आहे. जनतेने चेहरा नव्हे तर काम पाहून मतदान करावे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकार लोकशाहीमध्ये दडपशाही करत आहे. त्याच्याविरोधात आम्ही लढू. सत्तेत असलेले आमदार पोलिस ठाण्यात जाऊन गोळीबार करतात यावरून राज्यात कायदा, सुव्यवस्थेची काय स्थिती आहे हे लक्षात येते असे म्हणत त्यांनी सरकारवरही निशाणा साधला.